मतदारांच्या खांद्यावर लोकशाहीचे ओझे..! EVMचा घोळ करून नेते झाले राजे..!
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३० नोव्हेंबर २०२४ राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्याचा राज्यात लागलेला धक्कादायक निकाल हा संशोधनपर असल्याचा दावा सर्वसामान्य नागरिक मतदार बंधू आणि भगिनी हे व्यक्त होताना दिसत आहेत. भारताचे निवडणूक आयोग त्यांचे आयुक्त हे सुद्धा ह्या सामान्य नागरिकांच्या मतांची हेराफेरी करून लोकशाही वरती गदा आणण्याचं काम करत आहेत. निवडणुकीच्या एक महिना अगोदर ईव्हीएम मशीन ही गुजरात सुरत, येथून मागवण्यात आल्या. प्रत्येक वेळेला गुजरात हे राज्य निवडणुकीच्या लागणाऱ्या सामुग्री साठीच का? निवडले जातो.
ईव्हीएम मशीन घोटाळा करून निवडणूक जिंकल्या जातात. असं मत भारतातील सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे. हा देश संविधान, (राज्यघटने) वरती चालणारा आहे. सर्वसामान्य जनतेचा राज्यघटनेवरती लोकशाही वरती अजूनही विश्वास ठाम आहे. मा. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, त्याचप्रमाणे राज्यातील पोलीस यंत्रणा. पूर्ण सरकारी सिस्टीम केंद्राच्या हातात असून त्या सिस्टीमचा स्वतःच्या स्वार्थासाठी दुरुपयोग करून या देशातील प्रत्येक भारतीय राजवट हुकूमशाही प्रमाणे या सरकारचे वतिने चालवली जात आहे.
यापूर्वी या राज्यातील महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालणार्या महाराष्ट्राला कुठेतरी झुकवायचं काम करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तो कदापी ही महाराष्ट्र खपून घेणार नाही. शिव शाहू फुले आंबेडकर व अण्णाभाऊ चळवळ ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये आंदोलन छेडणार आहे. त्या दृष्टिकोनाने पहिले पाऊल हे पिंपरी चिंचवड शहरातून. तमाम सामान्य नागरिकेच्या वतीने. संभाजी ब्रिगेडर आयोजित ०१ डिसेंबरला पिंपरीत होणाऱ्या आंदोलनाला भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा जाहीर पाठिंबा असणार आहे. पाठीब्यांचे पत्र सतिश काळे यांना देण्यात आले आहे.
तसेच शिव शाहू फुले आंबेडकर व अण्णाभाऊ यांच्या चळवळीतील सर्व सामाजिक संघटना उद्या रविवार दिनांक ०१ डिसेंबर २०२४ रोजी दूपारी १२ वाजता पिंपरी येथिल डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये (भीमसृष्टी) येथे करणार आहे.
या आंदोलनामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने. तसेच पिंपरी चिंचवड शहर कमिटी, त्याचप्रमाणे, भिमशाही युवा संघटना, अध्यक्ष, शिवशंकर उबाळे, या संघटना उद्याच्या आंदोलनामध्ये सामिल होणार आहे.
भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य. राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ. चंद्रकांत उदगुडे पाटील, तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समिती उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य. शांताराम गणेश खुडे व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राजू पेटी यांचे वतिने पिंपरी-चिंचवड मधील सर्व सामाजिक संघटनांना या बातमीच्या माध्यमातून उपस्थित राहण्याचे आव्हान करीत आहे. असे भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष, शांताराम गणेश खुडे यांनी सांगीतले.