पिंपरी-चिंचवडकरांना पून्हा एकदा दिसला खाकीतला देव (देवी)..
वाहतूक शाखेतील महिला पोलीसांनी गरोदर महिलेला दिला ‘एक हात मदतीचा’..
डॉक्टरांच्या मदतीने केलं सुखरूप बाळांतपण…
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०३ डिसेंबर २०२४ पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हिंजवडी वाहतूक शाखेतील महिला पोलीस अमंलदारांनी गरोदर महिलेला मदतीचा हात देत माणुसकीचा प्रत्यय दाखवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. ०१) रोजी वाकड नाका येथे कर्तव्यावर कार्यरत असलेल्या महिला पोलीस अमंलदार महिला पोलीस हवालदार १६२४ नीलम विजय चव्हाण व मपोशि १६२३ रेश्मा नजीर शेख यांना २५ वर्षीय महिला राजश्री माधव वाघमारे या गरोदर असल्याचे दिसले.
त्या औंध हॉस्पिटल येथे जात असताना अचानक त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. सदर महिलेच्या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत प्रसंगावधान राखत महिला पोलीसांनी ॲम्बुलन्स व डॉक्टरांशी संपर्क साधला.
महिलेला जवळच असलेल्या खोलीमध्ये नेवून वैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर महिलेने मुलाला सुखरुप जन्म दिलेला आहे. ॲम्बुलन्स व डॉक्टर २० मि. आल्यानंतर सदर महिलेची व बाळाची पाहणी करुन पुढील औषध उपचार करण्यासाठी औंध हॉस्पिटल येथे घेऊन गेले आहेत.
महिला पोलीस हवालदार १६२४ नीलम विजय चव्हाण व मपोशि १६२३ रेश्मा नजीर शेख या महिला पोलीस अमंलदार यांचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी कौतुक केले.