महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

“शासनाने मांडला समतादुतांच्या जीवाशी खेळ” पायी लॉंग मार्चमध्ये दोन समतादूतांची प्रकृती बिघडली.

प्रतिनिधी पूणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व सामाजिक न्याय विभाग यांच्यामार्फत गेल्या नऊ वर्षापासून कामकाज करणाऱ्या समतादुतांच्या प्रलंबित मागण्यासाठी समतादूतांनी पुणे ते मंत्रालय मुंबई पायी लॉंगमार्च काढलेला आहे.या लॉंग मार्चच्या आज दुसऱ्या दिवशी समतादूत अर्चना चौरे व समतादूत कल्पना बेलसरे यांची प्रकृती बिघडली व त्या चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या, त्यातील एकीला तर थोडा वेळ दवाखान्यात नेण्यास लागला असता तर जीवाशी मुकावे लागले असते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मागील ९ वर्षात वंचित उपेक्षित घटकासाठी काम करणाऱ्या समतादुताच्या मानधनात एकही रुपयाची वाढ व प्रलंबित मागणी मान्य झालेली नाही. समतादूत विविध मागण्यासाठी मंत्रालयावर पुण्यातून पायी लॉंगमार्च सुरू केला आहे. आज दुसऱ्या दिवशी या समतादूतांच्या जीवाशी शासनाने खेळ मांडल्याचे लक्षात आले. अद्याप शासनाने समतादूत यांच्या मागणीकडे लक्ष दिलेले नसून बार्टीचे प्रशासनही रेड्याची कातडी पांघरून बसलेले असल्याचे पहावयास मिळते.
काय आहेत समतादूतांच्या मागण्या:-
१)समतादूत यांच्या समायोजन विषयी स्वयंस्पष्ट अहवाल बार्टी स्तरावरून मंत्रालय कक्ष अधिकारी यांना १८ मे २०२३ रोजी पाठविण्यात आलेला आहे. सदरील अहवाल प्रलंबित न ठवता शासनाने स्वीकारून समतादूत यांचे समाजकल्याण विभागामध्ये समायोजन १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी करण्यात यावे.
२) समतादूत यांना समायोजनाचे लाभ २०१६ पासून देण्यात यावे. समाजकल्याण मध्ये २०१६ पासून समायोजन करण्यात यावे.
३)समतादूत यांची पगारवाढ शासन आदेशामध्ये नमूद ३३९०० पूर्ण पगार लागू करण्यात यावा. सदरील पगार बार्टी आस्थापने मार्फत देण्यात यावा कोणत्याही त्रयस्थ कंपनी मार्फत देऊ नये, त्यामध्ये कसल्याही प्रकारची काटछाट करण्यात येऊ नये.
४) समतादूत यांना पगार व्यतिरिक्त TA. DA लागू करण्यासंदर्भात बार्टी संस्थेच्या नियामक मंडळात मंजुरी घेऊन निर्णय घेऊन TA.DA लागू करण्यात यावा.
५)सर्व समतादूत यांचे विमा काढून समतादूतांना कायमचे विमा संरक्षण देण्यात यावे.
६)पगारवाढ व समायोजन करतांना कोणत्याही समतादूत यांना वगळण्यात येऊ नये.
७) समतादूत पगारवाढ मार्च २०२३ पासून लागू करण्यात यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!