उत्सवपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरशुभेच्छासामाजिक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प.) पिंपरी चिंचवड शहराची आगामी महानगरपालिका निवडणूक लक्षात घेऊन कोअर कमिटीची स्थापना..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ नोव्हेंबर २०२५
पिंपरी चिंचवड शहराची आगामी महानगरपालिका निवडणूक लक्षात घेऊन पक्षाचे संघटन बळकट व्हावे व निवडणुकीला सामोरे जाताना सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकत्रित काम करावे यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. श्री. शरदचंद्र पवार यांनी यापूर्वीच बैठका घेतलेल्या होत्या.
प्रदेश अध्यक्ष मा. आ. श्री. शशिकांत शिंदे यांनीही सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आवश्यक त्या सूचना दिलेल्या होत्या. शहरातील बहुतांश नेत्यांनी मागणी केल्यानुसार मा. प्रदेश अध्यक्षांच्या मान्यतेने खाली नमूद केल्याप्रमाणे
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकी करिता “कोअर कमिटी ” स्थापन करण्यात आली आहे.
नियोजित कोअर कमिटी खालिल प्रमाणे..
१) मा. खा. डॉ. अमोल कोल्हे, खासदार
२) मा. हर्षवर्धन पाटील, प्रभारी
३) मा. आ. रोहितदादा पवार, आमदार व प्रदेश सरचिटणीस
४) मा. आझमभाई पानसरे, माजी महापौर
५) मा. प्रकाश म्हस्के, निरिक्षक
६) मा. तुषार कामठे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष
७) मा. देवेंद्र तायडे, पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष
८) सौ. सुलक्षणा शिलवंत, विधानसभा उमेदवार
९) मा. रविकांत वरपे, प्रदेश प्रवक्ता
१०) मा. संदीप चव्हाण, प्रदेश संघटक सचिव
११) मा. विक्रांत पाटील, प्रदेश संघटक सचिव
१२) मा. सुनिल गव्हाणे, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष
१३) मा. ज्योती निंबाळकर, महिला शहर अध्यक्षा
१४) मा. इम्रान शेख, युवक शहर अध्यक्ष
१५) मा. काशिनाथ जगताप, शहर उपाध्यक्ष
१६) मा. विशाल वाकडकर, युवक प्रदेश उपाध्यक्ष
१७) मा. जयंत शिंदे, शहर सरचिटणीस
कोअर कमिटीच्या नियंत्रण सापेक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाज करण्यात यावे व नियमित अहवाल प्रदेश कार्यालयास पाठविण्यात यावा अशी सूचना ही यावेळी देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!