आंदोलनआरोग्यघोटाळेमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

लवकरच पिं.चि.म.न.पा. आयुक्तांवर भ्रष्टाचार निर्मूलन समिती मार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार-शांताराम खुडे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ डिसेंबर २०२४ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने प्राधिकरण चिखली स्पाईन रोड, आर्थिक दुर्बल घटकासाठी बांधलेल्या घरकुल योजनेतील १६० इमारतीचे फायर ऑडिट करण्याबाबत वेळोवेळी सूचवले होते. मा. शेखर सिंह आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे नावाने त्यांच्या कार्यालयास पत्र व्यवहार केला होता. त्या संदर्भात आयुक्तांनी काय कारवाई केली त्याचा खुलासा करण्याबाबत पून्हा एकदा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने निवेदन दिले.
पिंपरी चिंचवड शहरांमधील आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधलेल्या इमारती दहा वर्ष झाली. त्या इमारतीमध्ये नागरिक राहत आहेत. त्यांच्या सुरक्षा बाबत प्रत्येक इमारतीमध्ये अगीची घटना घडू नये म्हणून फायर किट बसवलेले आहेत. पण त्या फायर किट दहा वर्ष जुन्या झाल्या आहेत. याबाबत आपणास दिनांक ४/०९/२०२३ रोजी आपल्या कार्यालयास पत्रव्यवहार केला होता. त्या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होती की. पूर्णा नगर चिखली येथे दिनांक ३१/०८/२०२३ रोजी पहाटे सचिन हार्डवेअर दुकानाला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आगीचे कारण हे शॉर्टसर्किट असल्याचे प्रशासनने व महावितरण यांनी दाखवण्यात आले होते. अग्नी तांडव पाहून आसपासच्या लोकवस्तीमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. तोच धागा पकडून आपणास पत्रव्यवहार करून कळवण्यात आले होती की. आर्थिक दुर्बल घटकातील बांधलेल्या घरकुलचं फायर ऑडिट लवकरात लवकर करण्यात यावे. पण आपण त्याकडे अक्षरशः दुर्लक्ष केलं. त्यानंतर दिनांक ३/१०/२०२३ रोजी स्मरणपत्र देण्यात आलं. आता तरी फायर ऑडिट होईल अशी अपेक्षा आम्ही तुमच्याकडून ठेवली होती. पण आपण त्याच्याकडेही दुर्लक्ष केल्यामुळे. आज प्रशासक म्हणून सामान्य नागरिकांचा तुमच्यावरचा विश्वास उडालेला आहे.
     त्यानंतर तळवडे एमआयडीसी मध्ये वाढदिवसाच्या कॅण्डल तयार करण्यासाठी ज्वालाग्रही व पावडर साठा असलेल्या कंपनीमध्ये भर दिवसा प्रचंड मोठा स्फोट झाला. त्यामध्ये देखील सुरुवातीला आठ जणांचा जागीच मृत्यू झालेले दाखवल्यानंतर मृतांची संख्या वाढत गेली.
       वेळोवेळी आपणास या संदर्भात जागृत करण्याचं काम भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केले आहे. आज ही आम्ही त्या विषयावरती ठाम असून. आपल्यावरती आम्ही आरोप करत आहोत. की आपल्याला पिंपरी चिंचवड शहरातील रहिवाशांचं त्यातल्या त्यात आर्थिक दुर्बल घटकातील सामान्य जनतेचे घेणे देणे नसून. आपण फक्त बिल्डर लाॅबी, शहरातील राजकारण नेतेमंडळी, त्याच्यामध्ये दंग असलेले दिसून येत आहात.
        त्यामुळे अनधिकृत बांधकामे करताना अधिकाऱ्यांचा खिसा गरम होत आहे. हे शंभर टक्के खरं आहे. त्यामुळेच अग्नीच्या घटना घडल्यानंतर कसला ही दोष नसलेल्या सर्व सामान्य जनतेचा, वृद्ध, लहान मुले, यांचा जीव कवडी मोलाचा असल्यासारखा जात आहे. याला सर्वेसर्वा फक्त आणि फक्त आयुक्त साहेब आपण जबाबदार आहात. हा माझा आपल्यावरती आरोप आहे. असे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शांताराम खुडे यांनी निवेदनात नमूद केले आहे पूढे ते लिहितात की
     अशा जीवतहनीच्या मोठ्या घटना शहरांमध्ये घडून गेल्यानंतर दुर्घटनेबाबत चौकशी समिती स्थापन करून अभिप्राय मागून देखावा करण्या पेक्षा योग्य वेळी योग्य काळजी घेणे ही काळाची गरज आहे. पण आजतागायत ते आपल्याकडून होताना दिसले नाही.
      १०/१२/२०२३ रोजी कुदळवाडी येथे झालेल्या अगीया दुर्घटनेत लाखो, करोडाेचे नुकसान झाले. अशी आपली यंत्रनाच सांगत आहे. पण हेच जर सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतलं असते तर आपण दुर्घटनेतील वारसांना पाच पाच लाख रुपये, वाटून या केसची फाईल बंद केली असती. सामान्य नागरिकांचा जीव म्हणजे फक्त पाच लाख रुपये किमतीचा नाही. जोपर्यंत माणूस जिवंत आहे. तोपर्यंत या शहराची जबाबदारी प्रशासक म्हणून’ आपली आहे. तुमच्याकडे सर्व यंत्रणा सज्ज असून देखील आपण त्या यंत्रणेचा कुठल्या ही सामान्य जनतेच्या सुरक्षा साठी वापर करत नाहीत. आणि केला नाही.
    या सर्व घटना आपल्या कार्यकाळात सरकारी प्रशासक म्हणून असताना घडल्या आहेत. म्हणून आपल्यावरती फौजदारी गुन्हा दाखल का करू नये… हा माझा आपणास सवाल, (प्रश्न) आहे.
     आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे कारण आपल्याला या अगोदर वेळोवेळी याबाबत सुचित करण्यात आलं होतं, की आगीच्या दुर्घटना विकसित शहरांमध्ये नैसर्गिक घटना घडू शकतात. सामान्य जनतेसाठी आपण त्यांच्या सुरक्षा बाबत आपला प्लॅन काय आहे. व तो आपण कसा राबवता. या आधारे आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
        आजच्या तारखेचे निवेदन त्याचप्रमाणे या अगोदर आपल्याला सूचित करण्यासाठी दिलेली निवेदन हे गृहीत धरून आपल्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
    आपण या कोणत्याच गोष्टी अमलात आणल्या नाहीत. तसेच बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग, अक्षरशः अधिकारी लोक चिरीमिरी साठी फक्त कारवाईचा देखावा करत आहेत. त्यामुळे हे दोन्ही विभाग आणि आयुक्त साहेब आपण स्वतः या सर्व गोष्टीला जबाबदार आहात.
काल या संदर्भात पालिका  उपआयुक्त मनोज लोणकर यांचेसोबत शांताराम खुडे यांची चर्चा देखिल झाली पण खुडे हे फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात ठाम असल्याचे समजते.

मागण्या व आरोप पुढील प्रमाणे..

१) आगीच्या घटनाबाबत चिंता..
पूर्णा नगर चिखली येथे दि.३१/०८/२०२३ रोजी सचिन हार्डवेअर दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

२) तळवडे एमआयडीसी येथे वाढदिवसाच्या कॅण्डल उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट होऊन अनेक निष्पाप सर्वसामान्य कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले होते. या घटनांमधून प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणती ही पावले उचलली गेली नाहीत.
  
आरोप..
सदर घटनांमध्ये प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यातील आहे. अग्नि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी व फायर ऑडिट न केल्यामुळे नागरिकांचे जिवित हानी व वित्तहानी होत आहे.
आपण प्रशासक म्हणून यास जबाबदार आहात. त्याचप्रमाणे आपल्या अखत्यारीमध्ये चालणारे विविध विभाग, प्रदूषण विभाग, बांधकाम विभाग, अग्निशामक विभाग, अतिक्रमण विभाग, सहसहा सर्वच विभाग शहरातील होणाऱ्या दुर्घटनेस, तसेच आगीच्या घटनेला जबाबदार आहेत.
टीप
आजच्या तारखेचे निवेदन त्याचप्रमाणे या आगोदर आयुक्त साहेबांना दिलेल्या निवेदनाच्या आधारे आम्ही आयुक्त साहेबांच्या विरोधात त्याचप्रमाणे बांधकाम विभाग अतिक्रमण विभाग यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत असे खुडे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!