प्रतिनिधी यलघोल मावळ दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती आणि बोधिसत्व चॅनल द्वारे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील यलघोल बुद्ध लेणीच्या प्रस्तावित कामाची पाहणी केली. अनेक दिवांपासून यलघोल या गावामध्ये असलेल्या बुद्ध लेणी पर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नव्हता व पावसाळ्यामध्ये या लेणीपर्यंत जाण्यासाठी खूप अडचण होत होती व लेणी पर्यंत जाता येत नव्हते मागिल वर्षी १० जून २०२३ रोजी लेणी संवर्धकांच्या वतीने व गावकऱ्यांच्या मदतीने लेणीपर्यंत जाण्यासाठी पाईप टाकून दोन पूल बनवण्यात आले होते कोणालाही अडचण न होता या लेणीपर्यंत पोहोचता येत होते.
या कामात आम्हाला सतत सहकार्य करणारे गावातील नागरिक लेणीपर्यंत रस्ता होण्यासाठी सतत प्रयत्न करणारे राजेंद्र घारे व गावातील सरपंच व गावकऱ्यांनी लेणीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता करून देण्याचा शब्द दिला होता व ग्रामसभेमध्ये गावातून यलघोल बुद्ध लेणी पर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता बनवण्यासाठी ठराव मांडून बहुमताने ठराव पास करून घेण्यात आला.
व आज २०,००००० लाखांचा निधी मंजूर करून लेणीपर्यंत जाण्यासाठी रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
लेणी संवर्धकांच्या मदतीने १० जून २०२३ रोजी पाईप टाकून लेणीपर्यंत जाण्यासाठी बनवण्यात आलेला छोटा पूल आज दगडी बांधकाम करून व मोठे पाईप टाकून पक्का पुल बनवण्यात आला आहे व लेणीपर्यंत जाण्यासाठी जेसीबीच्या साह्याने कच्चा रस्ता बनवण्यात आला आहे लवकरच हा कच्चा रस्ता पक्का सिमेंटचा करण्याच्या कामास सुरुवात होणार आहे हे लेणी संवर्धकांनी व यलघोल गावातील नागरिकांनी निस्वार्थीपणे केलेल्या कामाचे मोठे यश आहे.
त्याबद्दल सर्व लेणी संवर्धकांचे व यलघोल या गावातील सरपंच व राजेंद्र घारे व गावातील सर्व नागरिक यांच्या कार्याला सलाम करत मनोज गजभार यांनी धन्यवाद ही व्यक्त केले यावेळी ते बोलले की असेच सहकार्य जर प्रत्येक गावातून झाले तर आमची लेणी संवर्धकांची टीम या इतिहासा पर्यंत पोहचून तो इतिहास लोकांन पर्यंत नक्कीच पोहवू शकेल.