आंदोलनदेश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

अमित शाह यांनी आंबेडकरांवर केलेली टिप्पणी वादात? काँग्रेसकडून टीका, माफी मागण्याची केली मागणी..

विशेष प्रतिनिधी दि. १८ डिसेंबर २०२४ राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन केलेल्या टिप्पणीवर आता काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
काँग्रेसची अमित शाह यांच्यावर टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान मंगळवारी राज्यसभेत केलेली एक टिप्पणी वादात अडकली आहे. काँग्रेसने या टिप्पणीवर आक्षेप घेतला असून अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी किती राग आहे, हे अमित शाह यांच्या विधानावरून कळून येते, अशी टीका काँग्रेसने यावेळी केली.
काय म्हणाले होते अमित शहा..
अमित शाह राज्यसभेत भाषण करताना म्हणाले, “आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल.” या विधानाआधी अमित शाह म्हणाले होते की, आंबेडकरांचे नाव तुम्ही १०० वेळा जरी घेतले, तरी तुम्हाला आंबेडकरांविषयी काय वाटते, हे मी सांगतो.

अमित शाह यांच्या टिप्पणीनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट टाकून या विधानाचा निषेध केला आहे. “ज्यांना मनुस्मृतीवर विश्वास आहे, त्यांना आंबेडकरांची अडचण असते”, अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली.

काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनीही अमित शाह यांच्या भाषणावर जोरदार टीका केली. भाजपा आणि संघाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी किती घृणा आहे, हे अमित शाह यांच्या विधानातून दिसून येते. आंबेडकरांच्या नावाचीही त्यांना अडचण वाटते. हे तेच लोक आहेत, ज्यांचे पूर्वज आंबेडकरांचे पुतळे जाळत आहेत. जनतेने यांना धडा शिकवल्यानंतर आता त्यांना बाबासाहेब आठवत आहेत.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही अमित शाह यांच्यावर टीका केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही अमित शाह यांच्यावर टीका केली. “भाजपा आणि संघाने राष्ट्रध्वजाचा विरोध केला. अशोक चक्राला त्यांचा विरोध होता. संविधानाऐवजी त्यांना मनुस्मृती लागू करायची होती, मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी हे होऊ दिले नाही. म्हणूनच तुम्ही बाबासाहेबांचा द्वेष करता का?”, असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला.

यावरून भाजप आणि RSS च्या नेत्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रचंड द्वेष असल्याचे दिसून येते.

बाबासाहेबांच्या बद्दल द्वेष इतका आहे की त्यांचे नावही त्यांना डिवचत आहे. हे तेच लोक आहेत ज्यांचे पूर्वज बाबासाहेबांचे पुतळे जाळत असत, जे स्वतः बाबासाहेबांनी दिलेले संविधान बदलण्याच्या गप्पा मारत असतात.
आता जनतेने त्यांना धडा शिकवला असताना आता अमित शहा बाबासाहेबांचे नाव घेणाऱ्यांवर प्रचंड चिडले आहेत.

यासाठी अमित शहा यांनी देशाची माफी मागीतलीच पाहिजे. अशी आंबेडकरी जनतेची ही मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!