आरोग्यआर्थिकपिंपरी चिंचवड मनपा.पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

धन्वंतरी आरोग्य योजना पुन्हा मोफत सुरु करा – सुनिल कांबळे, सामाजिक न्याय विभाग सचिव 

प्रतिनिधी पिंपरी–चिंचवड दि. २७ सप्टेंबर २०२५ पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेतील हजारो अधिकारी व कर्मचारी वर्गाने अनेक वर्षे धन्वंतरी आरोग्य योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेमुळे कर्मचार्‍यांना व त्यांच्या कुटुंबियांना वेळेवर मोफत वैद्यकीय सुविधा मिळत होत्या. 
अलीकडेच महापालिकेने ही योजना बंद करून नवीन विमा पॉलिसी लागू केली आहे. यामुळे कर्मचार्‍यांवर प्रीमियम भरण्याचा आर्थिक भार टाकण्यात आला असून, अनेक रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष कॅशलेस सुविधा उपलब्ध नाही. 
महानगरपालिकेचा कर्मचारी हा शहराच्या कारभाराचा कणा आहे. त्यांच्या आरोग्याशी संबंधित योजना थांबवून त्यांच्यावर आर्थिक ओझे लादणे हा अन्याय आहे. 
आमची ठाम मागणी : १. मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब,  २. मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब,  ३. मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब,  या नेत्यांकडे आम्ही ठामपणे मागणी करतो की :- धन्वंतरी आरोग्य योजना पुन्हा मोफत सुरु करावी,  जर विमा योजना चालू ठेवायची असेल, तर संपूर्ण प्रीमियम महापालिकेने भरण्याची व्यवस्था करावी,  सर्व कर्मचार्‍यांना व त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस मोफत सुविधा मिळावी.  ही मागणी आम्ही मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष श्री. मयुर भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. 
महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या हितासाठी व प्रशासनाच्या सुचारू कामासाठी ही योजना तातडीने पुन्हा सुरु व्हावी, ही प्रामाणिक अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!