प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ डिसेंबर २०२४ देशाचे भूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा नुकताच वाढदिवस पार पडला वयाच्या ८५ व्या वर्षात पदार्पण करत असताना अनेक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. आदरणीय शरदचंद्रजी पवार ‘साहेब’ या नावाचं अजब रसायन सहा दशकं राजकीय, सामाजिक पटलावर आरूढ असणारे, ज्येष्ठातील तरुण तुर्क, आत्ताच्या पिढीचा ऐतिहासिक वारसा असलेल्या साहेबांचे सतत लढत राहण महत्त्वाचं हा एक संदेशच, आपल्याला आता शारीरिक मर्यादा आहेत, शुन्यातून पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढण शक्य आहे का? जाऊदे आता तिकडे तर तिकडे असे म्हणतील तर ते साहेब कसले, आज ही तरूणाईला लावणारा उत्साह, भेटायला आलेला प्रत्येक साध्यातला साधा माणुस मला भेटल्याशिवाय जाणार नाही हा अलिखित स्वतः:शिच केलेला करार म्हणजे ‘साहेब’. यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने चिंचवड येथील विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा पार पडला. एक मायेची ऊब म्हणून थंडीच्या दिवसांसाठी ब्लॅंकेटचे वाटप या निमित्ताने जेष्ठ नागरिकांना करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष सुवर्ण वाळके, उपाध्यक्ष रेखा मोरे, सचिन निंबाळकर चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी, सेक्रेटरी राजाराम गावडे, सह सेक्रेटरी भिवाजी गावडे, कॅशियर अरविंद जोशी, सह कॅशियर कुलकर्णी, मंगलाताई दळवी, खोत ताई, गावडे ताई, इनामदार ताई तसेच असंख्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
Close