मराठा सेवा संघ शहर कार्यकारिणीच्या नियुक्त्या जाहीर..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ डिसेंबर २०२४ मराठा सेवा संघाच्या २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन गुरूवार (दि.१९) रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन संततुकारामनगर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रकाश जाधव, राज्य पदाधिकारी प्राचार्य रामकिशन पवार, ॲड. लक्ष्मण रानवडे, संभाजी ब्रिगेडचे अभिमन्यू पवार मनोज गायकवाड जिजाऊ ब्रिगेडच्या स्मिता म्हसकर, सुनिता शिंदे, सुलभा यादव, अश्विनी पाटील, रेखा गुळवे हे मान्यवर उपस्थित होते. मराठा सेवा संघाची दिनदर्शिका पूर्णपणे अंधश्रद्धा मुक्त असून या दिनदर्शिकेत प्रत्येक दिवशी इतिहासात घडलेल्या घटनांची नोंद आहे. तसेच ही दिनदर्शिका मराठा सेवा संघाचे संस्थापक युगपुरुष पुरूषोत्तम खेडेकर यांच्या कार्याला समर्पित केली आहे.२०२५ हे खेडेकर यांचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. असे प्रकाश जाधव यांनी मनोगतात सांगितले. या कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे यांनी पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या निवडी जाहीर केल्या. यामधे डाॅ. शिवाजीराव ढगे शहर सचिव, सुनिल जाधव सहसचिव, दिलीप गावडे सहसचिव, संपतराव जगताप कोषाध्यक्ष, वसंतराव पाटील उपाध्यक्ष, प्रकाश बाबर उपाध्यक्ष, मंचक जाधव उपाध्यक्ष, वाल्मिक माने उपाध्यक्ष, विजय शिंदे संघटक, अरूण घोलप संघटक, संदीप नवसुपे संघटक, सत्यशिल जाधव संघटक यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. राज्य कार्यकारिणी सदस्य प्राचार्य रामकिशन पवार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले तसेच मराठा सेवा संघाच्या कार्याची माहीती देऊन पदाधिकाऱ्यांना सभासद नोंदणी अभियान राबविण्याचे आवाहन केले डाॅ. शिवाजीराव ढगे सुनिल जाधव यांनी निवडीबद्दल समाधान व्यक्त करून मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी बीड जिल्ह्य़ातील मस्साजोगचे युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी ॲड. लक्ष्मण रानवडे, शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, संभाजी ब्रिगेडचे प्रविण कदम, जिजाऊ ब्रिगेडच्या सुलभा यादव यांनी आपले विचार व्यक्त केले. जिजाऊ वंदना रत्नप्रभा सातपुते यांनी म्हणटली तर सूत्रसंचालन दिलीप गावडे यांनी केले.