केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा भिमशाही युवा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ डिसेंबर २०२४ गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा नेहरूनगर झिरो बॉईज चौक येथे भिमशाही युवा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते कमलेश वाळके यांनी केले. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष सहभागी झाले होते.
अनेक कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला यामध्ये किशोरजी गवळी, स्नेहलता पाटोळे, हरीश डोळस, धर्म जगताप, शांताराम खुडे, पांडुरंग डोंगरे, भिमशाही युवा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे आदि कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनामध्ये अविनाश चौधरी, विजय कांबळे, उत्तम जोगदंड, सूर्यकांत जावळे, सद्दाम शेख, विजय ओव्हाळ, रामभाऊ ठोके, युवराज तिकटे, लखन काकडे, साहेबराव ईनकर, बंटी ठोकळ, संजय जाधव, आदित्य काकडे, सुनिता पाटोळे, मीरा वाघमारे, अलका सूर्यवंशी, मनीषा प्रधान अदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे कमलेश वाळके यांनी निषेध व्यक्त करताना बोलले की महाराष्ट्रातील मंत्र्यांनी संविधानिक पदावरती काम करताना संविधाना विषयी किंवा कोणत्याही महामानवांन विषयी जबाबदारीने बोलणे गरजेचे आहे. अन्यथा बाबासाहेबांना व इतर महामानवांना माननारा समाज रस्त्यावरती उतरून बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना त्यांची खरी जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही असे बोलून गृहमंत्री अमित शहा यांचा जाहीर निषेध नोंदवला..
सदर आंदोलनामध्ये “अमित शहा राजीनामा दो”
“अमित शहा चले जाव”
“अमित शहा माफी मांगो माफी मांगो” अशा घोषणा देण्यात आल्या.