देश-विदेशविशेषशहरसामाजिक

दिर्घ प्रतिक्षेनंतर अखेर महायुतीचे खाते वाटप जाहिर !!

विशेष प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगांव दि. २२ डिसेंंबर २०२४ मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी शपथ घेतली. यानंतर १५ डिसेंबरला मंत्रीमंडळाचा विस्तार झाला होता. अखेर आज खातेवाटप जाहीर झाले.
यात १. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते, २. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग, ३. उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, ४. चंद्रशेखर बावनकुळे महसूल, ५. राधाकृष्ण विखेपाटील जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास), ६. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण, ७. चंद्रकात पाटील उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री, ८. गिरीश महाजन जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन, ९. गणेश नाईक – वनखाते, १०. गुलाबराव पाटील पाणीपुरवठा, ११. दादा भुसे शालेय शिक्षण,  १२. संजय राठोड माती व पाणी परीक्षण, १३. धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, १४. मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन, १५. उदय सामंत उद्योग आणि मराठी भाषा, १६. जयकुमार रावल मार्केटिंग आणि प्रोटोकॉल, १७. पंकजा मुंडे पर्यावरण आणि हवामान बदल, ॲनिमल हसबंडरी, १८. अतुल सावे ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी, १९. अशोक उईके आदिवासी विकास मंत्रालय, २०. शंभूराज देसाई पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय, २१. आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान, २२. दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, २३. अदिती तटकरे महिला व बालविकास, २४. शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम, २५. माणिकराव कोकाटे – कृषी, २६. जयकुमार गोरे ग्रामविकास, पंचायत राज, २७. नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन, २८. संजय सावकारे कापड, २९. संजय शिरसाट सामाजिक न्याय, ३०. प्रताप सरनाईक वाहतूक, ३१. भरत गोगावले रोजगार हमी, फलोत्पादन, ३२. मकरंद पाटील मदत व पुनर्वसन, ३३. नितेश राणे मत्स्य आणि बंदरे, ३४. आकाश फुंडकर कामगार, ३५. बाबासाहेब पाटील सहकार, ३६. प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
*राज्यमंत्री*
३७. माधुरी मिसाळ सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण, ३८. आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय, ३९. मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा, ४०. इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन, ४१. योगेश कदम गृहराज्य शहर, ४२. पंकज भोयर गृहनिर्माण,
अशी खातेवाटप झालेली आहे. या ही वेळी पिंपरी चिंचवडला मंत्रीपदाचा मान मिळालेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!