दोषींवर कारवाई व्हावी आणि पीडितांना भरपाई द्यावी- लोकसेवक युवराज दाखले.
प्रतिनिधी मुंबई दि. २२ डिसेंबर २०२४ महिला आयोग, एससी, एसटी आयोग, मानव अधिकार आयोग यांचा जो अहवाल येईल, त्याच्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि त्यानंतर आय. जी आणि एस.पी यांनी त्यांनी खरी माहिती दिली का ? याचा त्यांनी तपास करावा आणि योग्य कारवाई करावी, असे आवाहन सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना केली आहे.
लोकसेवक युवराज दाखले यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहात जे वक्तव्य केले आहे. त्यामध्ये तथ्य नाही.
पोलिसांनी केलेला अमानुष लाठीमार तत्काळ थांबवावा आणि कोंबिंग ऑपरेशन ताबडतोब थांबवावं.
आज जे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वक्तव्य केले की, आय.जी आणि एस.पी यांनी सांगितले की, कॉम्बिंग ऑपरेशन झाले नाही. कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये काही जणांची घरे तोडण्यात आली आहेत, घरात घुसून मारण्यात आले आहे. एका सव्वा महिन्याच्या बाळंतीण महिलेला सुद्धा मारण्यात आलेले आहे. अशा सर्व घटनांनची चौकशी ही आय. जी आणि एस.पी नाही, तर इतर कमिटी मार्फत करावी आणि पीडितांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही शिवशाही व्यापारी संघ संस्थापक/ अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी केली आहे.