पथविक्रेत्यांना परवाना द्या व अतिक्रमण कारवाई थांबविण्याबाबत फेरीवाला हॉकर्स महासंघ महाराष्ट्र राज्य सफाई कामगार संघटनेचे आयूक्तांना निवेदन-प्रल्हाद कांबळे
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २४ डिसेंबर २०२४ पिंपरी चिंचवड शहरात वेळोवेळी अतिक्रमण पथकाचे वतिने फेरीवाले हातगाडीवाले भाजी विक्रीते यांच्यावर पिंपरी चिंचवड शहरांमध्ये अनेक ठिकाणी कारवाई करण्याची मोहीम राबविली जात असल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांचे नुकसान होत आहे. यामुळे फेरीवाल्यामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी फेरीवाल्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करून त्यांना पर्यायी जागेची व्यवस्था करून देण्यात यावी, तसेच जोपर्यंत पर्यायी जागेची व्यवस्था होत नाही तोपर्यंत त्यांचेवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये.
पथविक्रेता लायसन्स करता लाभार्थ्यांकडून रक्कम रू. १४००/- इतकी रक्कम क्षेत्रीय
कार्यालयात अदा केली आहे. त्यास तीन ते चार महिने झाले आहेत. परंतु अद्यापपर्यंत त्यांना
लायसन्स दिले गेले नाही. तसेच अनेक लोकांकडून पैसे भरून घेण्याकरता क्षेत्रीय कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात. लायसन्स करीता रक्कम रू.१४००/- इतकी रक्कम भरून घेण्याकरीता गती वाढवावी. यामुळे शहरातील सर्व पथ विक्रेत्यांना पैसे भरण्याकरता सोपे जाईल. पथविक्रेत्यांना
लायसन्स लवकरात लवकर देण्यात यावे, जेणेकरून त्यांचेवर कारवाई होणार नाही व त्यांचे नुकसान ही होणार नाही. पथविक्रेता यांच्या संदर्भातले जाचक अटी व शर्तीचा ठराव केले आहे ते त्वरीत रद्द करण्यात यावे. पथविक्रेत्यावरचे वार्षिक भाडे कमी करण्यात यावे. तसेच शहरातील गटई कामगार, अपंग, दारिद्र रेषेखालील लाभार्थ्यांना डोक्यावर पाटी घेऊन भाजी विक्रेत्यांना सूट देण्यात यावी.
अतिक्रमण पथकाने पथविक्रेत्यांचा माल व काटे हातगाडी इतर साहित्य ताब्यात घेऊ नये.
ताब्यात घेतलेल्या हातगाडी टपरी दंडाची रक्कम रद्द करण्यात यावी. या संदर्भात लवकरात लवकर मीटिंग घेऊन विषय मार्गी लावण्यात यावे, असे या निवाेदनात नमूद केले आहे.