प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २४ डिसेंबर २०२४ उदया दि. २५ डिसेंबर रोजी
२५ डिसेंबर १९२७ ला विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे ‘महाड’ मुक्कामी जाहीरपणे दहन केले होते. पिंपरी चिंचवड शहरात मागील ८-१० वर्षांपासून मनुस्मृती दहन दिनानिमित्त पिंपरी येथील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या (भीमसृष्टी) स्मारकासमोर शहरातील आंबेडकरवादी व पुरोगामी संघटनांच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. याही वर्षी बुधवार दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता मनुस्मृतिदहनाचा सामूहिक दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह या कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे अशी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी सर्वांना विनंती केली आहे.