अण्णासाहेब मगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना महानगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष, माजी खासदार दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना महानगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि जितेंद्र वाघ यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणातील आण्णासाहेब मगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी माजी नगरसदस्य सचिन चिखले,उप आयुक्त रविकिरण घोडके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड नगरपालिकेच्या जडणघडणीत पहिले नगराध्यक्ष आण्णासाहेब मगर यांचा सहभाग होता. शहरातील पायाभूत सुधारणा आणि मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. नागरिकांसाठी विस्तृत रस्ते,पाणीपुरवठा,शाळा सार्वजनिक दवाखाने, उद्याने,वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे.



