नवी सांगवी पोलीस चौकीचे दुरुस्ती काम तातडीने करा मेघराज लोखंडे यांच्याकडून पिंपरी -चिंचवड मनपा अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २९ मे २०२५ पावसाळा सुरू झाल्यामुळे पिंपळे गुरव डायनासोर गार्डन येथे असलेल्या नवी सांगवी पोलीस चौकी समोर भरपूर प्रमाणात पाणीसाठा होत आहे. त्यामुळे पोलीस चौकीमध्ये तक्रार घेऊन येणाऱ्या पिडीत नागरिकांना व पोलीस बांधवांना तो त्रास वारंवार सहन करावा लागत होता. त्यानंतर त्रस्त नागरिकांनी मेघराज लोखंडे चिंचवड विधानसभा अध्यक्ष ( राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार ) यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सदर कामाची पाहणी स्व:ता मेघराज लोखंडे यांनी करत त्या ठिकाणी डासोत्पत्ती होऊन डेंग्यू, झिका, चिकुनगुन्या व मलेरिया सारखे गंबीर आजार वाढण्याची शक्यता आहे असे मेघराज लोखंडे यांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी मा. सह शहर अभियंता स्थापत्य उद्यान व क्रीडा विभाग (पिंपरी चिंचवड महानगरपालिका) येथे निवेदन देऊन सदर काम लवकरात लवकर करावे अशी मागणी केली.
महाराष्ट्र पोलीस हे आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात आपण देखील त्यांची काळजी घेणे आपलं कर्तव्य आहे व नवी सांगवी पोलीस चौकी दुरुस्तीचे काम येत्या २ दिवसात सुरू होईल असे मेघराज लोखंडे यांनी प्रसिद्ध पत्रात म्हटले आहे.
यावेळी अवधूत कदम, अथर्व जाधव, जयेश गौरकर व इतर उपस्थित होते.



