
पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध उत्खनन प्रकरण तापले काशिनाथ जगताप यांचे तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण..
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. १२ ऑक्टोबर २०२५ मागिल महिन्यात दि. २७ सप्टेंबर २०२५ पिंपरी-चिंचवड शहरात अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात तब्बल २००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ संभाजी जगताप यांनी अप्पर तहसीलदारांवर गंभीर आरोप करत तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणास सूरूवात केली आहे.
विभागीय आयुक्त जिल्हा अधिकारी व प्रांत यांना पत्र व्यवहार करून दोन दिवसांन पूर्वी दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी अप्पर तहसील कार्यालयासमोर उपोषण सूरू केले असल्याची माहिती जगताप यांनी प्रसिद्धी
पत्रकाद्वारे दिली आहे.
जगताप यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या २ वर्षापासून अवैध गौण खनिज उत्खननाचे १०८ पेक्षा अधिक प्रकरणे अप्पर तहसील कार्यालयाकडे देऊनही अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट बिल्डर व डेव्हलपर्स यांना नोटीस न पाठवता व तक्रारदारांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय देऊन शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवला
असून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले आहे.
या प्रकरणात लवकरात लवकर चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विभागीय आयुक्ताकडे, जिल्हाधिकारी व प्रांत यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनात सांगीतल्या प्रमाणे दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी अप्पर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सूरू करण्यात आले आहे. या उपोषनाचा हा तिसरा दिवस आहे. अशी माहिती काशिनाथ जगताप यांनी दिला आहे.



