महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

भारतीय संविधान दिन साजरा करण्याकरिता पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ नोहेंबर २०२३ राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गट पिंपवड मधे सक्रिय असल्याचे वेळोवेळी दिसत आहे. काल याच गटाच्या सामाजिक न्याय विभागाची एक बैठक संपन्न झाली. भारतीय संविधान दिनाच्या कार्यक्रमाबाबत पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष श्री. मयूर जाधव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेता श्री. देवेंद्र तायडे यांच्या सोबत एक आढावा बैठक पिंपरी चिंचवड शहरात घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राज्य महासचिव श्री. राजन नायर यांनी उपस्थित राहून चर्चेत भाग घेतला.
बैठकीमध्ये पिंपरी चिंचवड शहर, चिखली, घरकुल, वाकड, काळाखडक, दापोडी, सेक्टर २२, निगडी, पिंपरी, भोसरी, परिसरातील छत्रपती शिव, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत कार्य करणारे सर्व महिला, पूरूष व युवक सामील होते.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष श्री. मयूर जाधव, वरिष्ठ नेते देवेंद्र तायडे व महाराष्ट्र राज्य सचिव के. डी. वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. आणि येणार्‍या काळात सामाजिक न्याय विभाग बळकट करण्याबाबत व सर्व मिळून शरदचंद्र पवार साहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रात व विशेषतः पिंपरी चिंचवड शहरात येणार्‍या महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र अध्यक्ष माजी आमदार श्री. जयदेवराव गायकवाड, शहराध्यक्ष तुषार कामठे, यांच्या नेतृत्वाखाली अधिक मजबूत कशाप्रकारे करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राज्य सरचिटणीस श्री. राजन नायर यांनी मनुवादी सरकार व्दारे दलित, अल्पसंख्याक समाजावर होणार्‍या अन्याय व अत्याचार याविषयावर प्रकाश टाकला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जास्तित जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प केला. यावेळी महिला व पूरूष असे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!