प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुलुंड मूंबई दि. ०३ जानेवारी २०२५ अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत असताना हा हल्ला झाल्याचे समजते. या संदर्भात पोलिसांनी तत्काळ हल्लेखोराला ताब्यात घेतले व गुन्हा दाखल केला आहे. सहा. आयुक्त घुगे हे सुरक्षित असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगीतले.
यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी आहे.
ठाण्यात काही वर्षा पासुन वाढत असलेली अनधिकृत बांधकामे व त्यातून पैसा व पैशातून सत्ता हि समीकरणे उदयाला येत असताना मनपाचे प्रामाणिक अधिकारी अनधिकृत बांधकामांवर मोठ्या धाडसाने कारवाई करण्यात गेले की विविध दबावाला सामोरे जावे लागत आहे. पर्यायी जीव घेणे हल्ले होत आहेत. २०१२ साली याच दिव्यात तत्कालीन धाडसी, कार्यतत्पर, सडेतोड, अधिकारी अशोक बुरुपुल्ले व त्यांच्या सहकाऱ्यांवर देखिल जीव घेणा हल्ला झाला होता, त्यांना बेदम मारहाण करण्यात आली असतानाही अशोक बुरुपुल्ले यांनी दिव्यातील अनधिकृत गोदामे जमीनदोस्त केली होती. पण त्यांची निवृत्ती नंतर पुन्हा हजारो अनधिकृत बांधकामे त्या ठिकाणी उभी राहिली आहे. पोलीस बंदोबस्त असताना अधिकाऱ्यावर जीव घेना हल्ला होतो ही हिम्मत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या मध्ये येते कुठून हा संशोधनाचा विषय आहे. दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त भालचंद्र घुगे हे उच्च शिक्षित, धाडसी व प्रामाणिक अधिकारी असून त्यांच्या वरील हल्ल्याने राजकीय व प्रशासकीय वर्तुळात नाराजी व्यक्त केली जात आहे. व गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागनी करण्यात येत आहे.