लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन.
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ०३ जानेवारी २०२५ क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने आज पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी घोषणा देत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला वंदन करण्यात आले.
या कार्यक्रमास लोकहितवादी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष धर्मराज बनसोडे, महाराष्ट्र राज्य सचिव विशाल वाघमारे, संपर्क प्रमुख अतिश दुधावडे, सामाजिक कार्यकर्ते सौ. प्रफुल्ला मोतलिंग, रुपेश शिंदे, मनोज धुरंधर आणि लोकहितवादी सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रोहित चांदणे उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणांसाठी दिलेले योगदान आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे मत यावेळी लोकहितवादी सेवा संघ संस्थापक अध्यक्ष धर्मराज बनसोडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर व्यक्त करणाऱ्या घोषणांनी करण्यात आला.