आर्थिकमहाराष्ट्रशहरसामाजिक

मे. कोर्टाच्या आदेशाला झूगारत एस. जे. कॉन्ट्रॅक्ट प्रायवेट लिमिटेड कंपनीने दाखवली आदेशाला केराची टोपली- सुनिल बिरादार

प्रतिनिधी पुणे दि. ०५ जानेवारी २०२५ एस. जे. कॉन्ट्रॅक्ट प्रायवेट लिमिटेड कंपनी मध्ये वरचे काम शता सिद्धी इंडस्ट्रियल या माध्यमातून उद्योजक सुनील बिरादार यांनी काम केले होते. या कामाची एकूण रक्कम होती ९ लाख ७६ हजार ९६ रूपये. त्यापैकी ८लाख ७५हजार रूपये टप्या टप्यात कंपनीने दिल्याचे उद्योजक सुनिल बिरादार यांनी सांगीतले.
परंतु उर्वरित रक्कम १लाख १०९६ रूपये देण्याकरता टाळाटाळ करत असल्याने स्मॉल इंडस्ट्री कोर्टामध्ये दावा दाखल करण्यात आला होता मेहरबान कोर्टांने उरलेले १ लाख१०९६ रूपये व कायद्याप्रमाणे व्याजाचे पैसे देण्याचा आदेश (ऑर्डर) देऊन सुद्धा वरील प्राइवेट लिमिटेड कंपनी कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे या संदर्भात रीतसर बालेवाडी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देऊन सुद्धा तपास अधिकारी संगनमताने कोर्टाच्या ऑर्डरकडे दुर्लक्ष करत असल्याचे उद्योजक सुनिल बिरादार यांनी सांगीतले.
या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उद्योग मंत्री उदय सावंत साहेब यांच्याकडे दाद मागणार असल्याचं उद्योजक सुनील बिरादार यांनी सांगितले आहे. दाद मागून सुद्धा न्याय न मिळाल्यास एस. जी. कॉन्ट्रॅक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गेट समोर अमरण उपोषणाचा इशारा उद्योजक बिराजदार यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!