आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

मुंब्रा इथे मराठी बोलण्याची मागणी केल्यामुळे मारहाण आणि माफीनामा प्रकरण..

प्रतीनीधी सतिश वि.पाटील मुलुंड मूंबई दि. ०५ जानेवारी २०२५ मराठी बोलण्यास सांगितले म्हणून मुंब्र्यात काही परप्रांतीयाकडून दहशद माजवून जमाव करून मराठी मुलांकडून माफीनामा लिहून घेतला मारहाण केली त्याविषयी आज मराठी एकीकरण समिती ठाणे माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून सदर सर्व परप्रांतीय गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी आज समितीमार्फत लावून धरली असता मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की मराठी माणसावर मराठी म्हणून कोणीही डोळा वर केला तर त्यावर कार्यवाही होईल. तरी ही हे प्रकार निंदनीय आहेत यासाठी कठोर कायदा असावा अशी मागणी आम्ही करत आहोत. मराठी मातीत असे किती प्रकरणे अजून होणार आणि हा संघर्ष शासनाने पेटू देऊ नये अन्यथा भाषिक लढा हा राज्याची कायदा व्यवस्था बिघडविण्यास कारणीभूत ठरेल. एक दिवस स्थानिक मराठी माणसाचा उद्रेक होईल आणि यासाठी व्यवस्था व राजकीय लोक जबाबदार राहतील असे मत समिती पदाधिकरी यांनी व्यक्त केले. अशा प्रकारात प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वरक्षण व न्याय मिळवून देण्यास सरकार संक्षम असावे भविष्यात अशा घटनांना आळा बसावा आज मुंब्रा भारतात आहे याची जाणीव असावी ! असे मराठी एकीकरण समिती ठाणेचे पदाधीकारी बोलत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!