हिंजवडी पोलीसांकडुन गावठी बनावटीचे दोन पिस्टल व काडतुस हस्तगत
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०९ जानेवारी २०२५ मा. पोलीस आयुक्त सो. पिंपरी चिंचवड यांनी पोलीस आयुक्तालय हददीतील अवैध शस्त्रे बाळगणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करून तसेच गोपनीय माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेशीत केल्याने, दि. ०६ जानेवारी २०२५ रोजी हिंजवडी पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकातील सहा. पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ पांचाळ, पोलीस हवा. १६६२ गिलबिले, पोलीस हवा. ८७३ केंगले, पोलीस शिपाई २६५९ रवी पवार असे हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्रे शोध व कारवाईकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई २६५९ रवी पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मेझा ९ हॉटेल जवळ हिंजवडी येथे एक काळया रंगाचा शर्ट घातलेला एक इसम कमरेला पिस्टल लावुन पॅशन मोटरसायकलवरून फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने सपोनि सोमनाथ पांचाळ यांनी सदर बातमीचा आशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कन्हैय्या थोरात यांना कळवुन त्यांनी सदर बातमीची खात्री करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकाने बातमीप्रमाणे सापळा लावुन मेझा ९ हॉटेल जवळ इसम नामे विकी दिपक चव्हाण वय १९ वर्षे रा. सोन्या केसवड यांची खोली, धुमाळवाडी, घोटावडे, ता. मुळशी जि. यांस १९:०० वा. शिताफीने ताब्यात घेवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे पँटचे मागील बाजुस खोचलेले ०२ गावठी लोखंडी पिस्टल व पँटचे खिशा मध्ये ०४ राऊंड मिळून आल्याने त्याचेवर हिंजवडी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस करण्यात आले आहे. सदर आरोपी हा शरद मोहोळ टोळीशी संबंधित असल्याचा कयास आहे. अधिक तपास हिंजवडी पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ पांचाळ हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. विनय कुमार चौबे सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा.श्री. डॉ. शशीकांत महावरकर सो. सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी सो. अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस उप आयुक्त परि. ०२ पिंपरी चिंचवड, मा. श्री. सुनिल कु-हाडे सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिं चिं यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. ऋषीकेश घाडगे, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ, श्रेणी पोलीस उप निरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार नरेश बलसाने, कैलास केंगले, मधुकर कोळी, प्रशांत गिलबिले, विजय गेंगजे, रवी पवार, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, विशाल भोईर, मंगेश लोखंडे यांनी केली आहे.