आर्थिकमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

!!! शेळके यांच्या वडिलोपार्जीत वाड्यात बांधकामाची खोदाई करताना सापडली तिजोरी पहायला गावं झाले गोळा !!!

प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगांव दि. ०७ जानेवारी २०२५ या बाबत सविस्तर वृत्त असे की शहरात भोई गल्ली भागातील रमेश पद्माकर शेळके उमेश पद्माकर शेळके आणि नितीन पद्माकर शेळके त्यांची चुलत बहीण आशा गणेश वारकडं यांच्या मालकीच्या वाड्यात बांधकामाकरिता खोदकाम करताना दोन दिवसांपूर्वी  सापडली तिजोरी वाड्याच्या शेजारी राहणाऱ्या श्रीमती. आशा गणेश वारकडं  या जागा मालकाने शेवगांव पोलिसांना फोन करून सांगितले की आमच्या घरा शेजारी शेळके व वारकडं सयुंक्त मालकी असलेल्या जुन्या जीर्ण झालेल्या  बांधकामात गुप्त धन असलेली तिजोरी सापडली आहे. शहानिशा करण्यासाठी पोलीस पथक तिथे गेले असतात तो पर्यंत हि बातमी वाऱ्यासारखी शेवगाब शहरात पसरली तिजोरी मिळालेले गुप्त धन पाहण्यासाठी हौशे गवशे आणि नवशे यांनी तोबा गर्दी केली आमच्या प्रतिनिधीने सखोल माहिती घेतली असता ही तिजोरी कै. माधवराव नारायणराव शेळके यांच्या नावाची होती पूर्वी शहराची पाटीलकी शेळके घराण्याकडे असल्याने व त्यांचे शहरात आजही बाजारपेठ धनगर गल्ली मारवाडगल्ली आणि भोई गल्ली भागात जुने वाडे असल्याने पाटीलकी असल्याने गावगाड्याचे जुने कागतपत्र आणि ऐवज सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे तिजोऱ्या होत्या त्यातीलच ही एक पण बोभाटा झाल्याने गावं झाला गोळा.

ताजा कलम
शेवगांव शहराच्या जुन्या भागात भारदे गल्ली, ब्राम्हण गल्ली, माळी गल्ली, मारवाड गल्ली, नाईकवाडी मोहल्ला, धनगर गल्ली, खालची वेस या भागात  अनेक जुने वाडे असल्याने व गेली कित्येक पिढ्या इथे एकाच परिवाचे लोक राहत असल्याने खोदकाम करताना जुन्या मूर्ती तिजोऱ्या ऐतिहासिक पुरावे, महादेवाची पिंड, विठ्ठल रखुमाईच्या मुर्त्या सापडल्याचे दाखले आहेत. पण गुप्त धन सापडल्याच्या अफवेने शेळके परिवाराची अख्खी भावकी खुप मोठ्या आशेने या तिजोरीवर दावा सांगण्यासाठी गोळा झालेली दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!