महाराष्ट्रराजकीयविशेषशहरशुभेच्छासामाजिक

सामाजिक परिवर्तनाची नांदी-भीमशक्तीचा नवा बुलंद आवाज म्हणून सुरज गायकवाड यांची आजाद समाज पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड, दि. ०२ जूलै २०२५ शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची मशाल घेऊन संविधानाच्या रक्षणासाठी, सामाजिक न्यायासाठी आणि वंचितांचे हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणारे युवा नेते सुरज चंद्रकांत गायकवाड यांची आजाद समाज पार्टी (कांशीराम) च्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.
ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश प्रभारी व माजी मंत्री गौरीप्रसाद उपासक, प्रदेश प्रभारी रुपेश बागेश्वर, प्रदेश अध्यक्ष मनीष साठे, प्रदेश उपाध्यक्ष मानसी पवार, लीगल सेल अध्यक्ष रवींद्र आरु, तसेच पुणे जिल्हाध्यक्ष भिमराव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
संघर्षातून घडलेले नेतृत्व – सुरज गायकवाड
गेल्या १५ वर्षांपासून शिव, फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत सक्रिय असलेले सुरज गायकवाड हे नाव आज पिंपरी चिंचवडच्या सामाजिक व राजकीय व्यासपीठावर संघर्ष, नेतृत्व आणि संघटनाचे प्रतीक बनले आहे.
त्यांनी विविध सामाजिक प्रश्नांवर झोपडपट्टी, कामगार वस्ती, ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजासाठी आंदोलनं केली आहेत. यापूर्वी त्यांनी बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष म्हणून देखील ठसा उमटवला आहे.
आजाद समाज पार्टी-संविधानासाठी नवा एल्गार
या निवडीनंतर आजाद समाज पार्टीने पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. सुरज गायकवाड यांनी स्पष्टपणे सांगितले
“ही निवड सन्मान नाही तर वंचितांचा आवाज बनण्याची जबाबदारी आहे. आम्ही फक्त निवडणूक लढवणार नाही, तर संविधान, सामाजिक न्याय आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्वांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू. भीमशक्तीचा बुलंद आवाज आता पिंपरी चिंचवडच्या गल्लीबोळात घुमणार आहे.”
संघटन + संघर्ष = परिवर्तन
गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वस्ती संवाद यात्रा, संविधान जागर अभियान, भ्रष्टाचारविरोधी संघर्ष, झोपडपट्टीतील समस्या व कामगार हक्कांवरील आंदोलन या माध्यमातून शहरात सामाजिक परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे.
आजाद समाज पार्टी ही केवळ निवडणुकीपूरतीची पार्टी नसून, एक सामाजिक क्रांतीचे साधन आहे, ज्यामध्ये समानता, हक्क, सशक्तिकरण व समता यांचे मूल्य केंद्रस्थानी आहेत.
असे नव निर्वाचित आजाद समाज पार्टी (कांशीराम), पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सुरज गायकवाड यांनी यावेळी बोलले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!