
प्रतिनिधी पुणे दि. ०२ जून २०२६ पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर विठ्ठलवाडी गावानजीक मोठा अपघात घडला.कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तसेच राष्ट्रीय महामार्ग बनविणाऱ्या ठेकेदाराकडून व रस्त्याचा मेंटेनन्स बघणाऱ्या टोल माफीया कडून रस्त्याच्या दुतर्फा कोणताही संरक्षक कठडा बसवला नसल्यामुळे कार विठ्ठलवाडी येथील ब्रिजवरून थेट खाली कोसळली. कार मधील चार ते पाच लोक गंभीर जखमी झाले.
विठ्ठलवाडी गावानजीक अपघात झाल्यामुळे गावातील नागरिक व रोडवरील वाटसरू मदतीसाठी धावले. घटनेची तीव्रता बघता तातडीने रुग्णवाहिका बोलवण्यात आल्या.
पहिल्या आलेल्या रुग्णवाहिकेतून कारमधील काही जखमी लोकांना हॉस्पिटलला नेण्यात आले. पण एका वेळी इतक्या लोकांना नेणे शक्य नव्हते त्यामुळे दुसरी रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली. त्या रुग्णवाहिकेत एक महिला व एक पुरुष व त्यांचे लहान बाळ होते. त्या सर्वांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल केल्यानंतर जखमींवर तातडीने उपचार सुरू झाले, पण लहान बाळावर उपचार करण्यात अडचणी निर्माण व्हायला लागल्या. बाळाची परिस्थिती अत्यंत प्रतिकुल होती. त्यावेळी क्षणाचा ही विलंब न करता आपले कर्तव्य समजून आपल्या रुग्णवाहिकेतून त्या बाळाला घेऊन आलेले सामाजिक कार्यकर्ते प्रेमकांत कांबळे यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडले. बाळाची नाजूक परिस्थिती बघता प्रेमकांत यांनी ईश्वरपुरातील डॉक्टर पोरवाल यांच्याकडे त्या बाळाला घेऊन गेले. बाळाची नाजूक परिस्थिती बघता डॉक्टर पोरवाल यांनी बाळाला NICU ची तातडीची गरज असल्याचे सांगितले.
अपघात ग्रस्त यांच्या कोणत्याही नातेवाईकाशी संपर्क झालेला नसताना गाडीतील सर्व नातेवाईक गंभीर जखमी असताना प्रेमकांत यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आपल्या रुग्णवाहिकेतून तातडीने त्या बाळाला कोल्हापूर येथील स्पर्श मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल केले. त्यामुळे बाळाला तातडीने उपचार देणे शक्य झाले.
सर्व गंभीर जखमींवर तसेच बाळावर तातडीने उपचार सुरू झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
फक्त व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता घटनेचे गांभीर्य ओळखून रक्ताच नातं नसूनही माणुसकीच्या भावनेतून बाळाला तातडीने उपचार मिळवून देणाऱ्या प्रेमकांत यांच्यातील माणुसकीचे दर्शन झाले. व त्यांच्या हजरजबाबी पणे केलेल्या कार्याबद्दल प्रेमकांत कांबळे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे..



