आरोग्यमहाराष्ट्रविशेषसामाजिक

शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रता संघ महारक्तदान १,८४१ लोकांनी केले रक्तदान..

प्रतिनिधी सतिश वि.पाटील मुलुंड दि. १८ जानेवारी २०२५ सामाजिक बांधिलकी जपत “रक्तदान महा दान” शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई व बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ (लोअर परेल विभाग) यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन १,८४१ ऐकून रक्तदाते व महीला १२५ असा विक्रमी आकडा पार केला.
हे शिबीर उद्योगपती दिवंगत रतन टाटा यांच्या विचारांना व सामाजिक कार्यास समर्पित करण्यात आले. घरोघरी जाऊन वृत्तपत्र विक्रेता सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून रक्तदान करण्याचे आवाहन केल्याची माहीती बृहन्मुंबई
वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जिवन भोसले यांनी दिली. तसेच या महारक्तदान शिबिरासाठी के ई एम, नायर, वाडिया, शीव, मीनाताई ठाकरे, जनलोक हाॅस्पिटल यांचे मोलाचे सहकार्य लाभले शिबीरात १३५ वेळा रक्तदान केलेले प्रकाश नाडर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अनुवाद आपला न्युजचे मुलुंड मूंबईचे पत्रकार सतिश वि.पाटील यांनी देखिल रक्तदान करून आपले मानवी कर्तव्य पार पाडले आयोजकांच्या वतिने त्याचा सत्कार करण्यात आला.
बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष सुभाष देसाई, विधान परिषद आमदार सुनिल शिंदे, आमदार शिवाजी पाटील, माजी महापौर किशोरी पेडणेकर आदी मान्यवरांनी या कार्यक्रमास भेट दिली. तसेच बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे संजय चौकेकर, रविंद्र चिले, बाळा पवार, जय उतेकर, प्रकाश गिलबिले, तिरूपती को.आ ऑप. सोसायटीचे अध्यक्ष डाॅ. निलेश मानकर यांचे सहकार्य लाभले, शिवशाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र देसाई, सचिव कृष्णा पाटील यांनी सर्वाचे आभार मानले, सर्व स्थरांतून मिळालेले सहकार्य पाहून त्यांचेही आदर सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!