आर्थिकशहरसामाजिक

नो पार्किंगच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड मध्ये भष्टाचार सुरू आहे. सचिन काळभोर

पिंपरी चिंचवड शहरातील नो पार्किंग मध्ये गाड्यांवर कारवाई करण्यात येत असून टोइंग व्हॅन मध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती नो पार्किंग मध्ये गाड्यांवर दंडात्मक कारवाई करत असून प्रत्येक गाडीला नो पार्किंग मध्ये दंडात्मक कारवाई करताना ७३६ रुपये टू व्हीलर गाडी साठी दंड वसूल करण्यात येत आहे. तर ९ टेम्पो १ क्रेन संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील नो पार्किंग मध्ये गाड्यांवर कारवाई करत असून बीना पावती गाड्या वर कारवाई करण्यात येतं असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांना खरी किती गाड्यांवर कारवाई करण्यात आली ह्याची आकडेवारी देत नाही?
करोडो रुपयांचा घोटाळा सुरू असून नो पार्किंग नावाखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन व निर्मला ऑटो केअर संस्था ह्यांच्या माध्यमातून नो पार्किंग मध्ये गाड्यांवर कारवाई करण्यात येतं असून रोज शहरात तीन ते चार हजार ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येतं असून फक्त कागदोपत्री ८०० ते ९०० ठिकाणी नो पार्किंग कारवाई करण्यात आली म्हणून दाखविण्यात येत आहे. ठेकेदार करोडो रुपये नो पार्किंग मध्ये गाड्यांवर कारवाई करुन पैसे गोळा करत असून प्रत्येक टेम्पो मध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी व आठ गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती गाड्या उचलून दंडात्मक कारवाई करत आहे. तर दुसरीकडे स्वतः वाहतूक पोलीस कर्मचारी तसेच गाड्या उचलणारे बीना पावती दंड रक्कम वसूल करून गाड्या सोडत असून त्या मुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्याचे प्रत्येक दिवसाला लाखो रुपयांचे नुकसान होत असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन ठेकेदाराचा नो पार्किंग ठेका रद्द करून शहरातील गाड्या उचलण्यासाठी बचत गटांना प्राधान्य देण्यात यावे तसेच नो पार्किंग मध्ये गाड्यांवर कारवाई केली तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी त्यांची
रितसर नोंदणी करून आकडेवारी नागरिकांना रोज उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून नो पार्किंग नावाखाली भष्टाचार होणार नाही. आम्हाला मिळालेल्या माहिती नूसार जवळपास २००० हजार गाड्यांवर पिंपरी चिंचवड शहरात कारवाई करण्यात येत आहे रेकाॅर्ड वर फक्त १०००/१५०० दाखवलं जातं आहे.
चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांनी नो पार्किंग धोरण आकारले असून मुंबई-पुणे महामार्गावर पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. नागरिकांना विनाकारण नो पार्किंग मुळे त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नो पार्किंग नावाखाली गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती नो पार्किंग मध्ये गाड्यांवर कारवाई करत असताना उद्धट वर्तन करत आहेत?
गाड्या उचलताना पूर्वी माईक वर घोषणा करण्यात येत होती. आता त्या नियमांची पायमल्ली होत आहे. गुन्हेगारीस्वरुपाचे कामगार गाड्या उचलत आहे. विचारणा केली असता अर्वाच्यस्वरूपात भाषा वापरली जाते. तरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी महिला बचत गटांना नो पार्किंग मध्ये गाड्यांवर कारवाई करण्याचा ठेका देण्यात यावा असे धोरण राबवून महिला बचत गटांना संधी देण्यात यावी. करसंकलन या ठिकाणी महिला बचत गटांना मालमत्ता कर आकारणी करण्यासाठी ज्या प्रकारे बचत गटांना प्राधान्य दिले तसेच नो पार्किंग मध्ये गाड्यांवर कारवाई करण्याकरीता म्हणून शहरातील महिला बचत गटांना प्रत्येक प्रभागात संधी उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून भष्टाचार होणार नाही. असे सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर यांनी सांगीतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!