
प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुबंई दि. २५ जून २०२५ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाच्या समर्थनार्थ, आणि दि. बा. पाटील साहेबांना मानवंदना देण्यासाठी भव्य “दि.बा. समर्थन कार, बाईक आणि रिक्षा रॅली” दिनांक: २४ जून २०२५ सकाळी ११.०० वाजता लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, भिवंडीचे खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे, आमदार बाळाराम पाटील, डॉ. यशवंत सोरे, डॉ. प्रा. विनोद पाटील, निलेश पाटील, दिपक म्हात्रे, दिपक पाटील, संतोष केणे, विशुभाऊ म्हात्रे, विजय पाटील, संजय मढवी, डॉ. तपन पाटील, संतोष घरत, दिपक पाटील, विनोद म्हात्रे, मनोहर पाटील, सुशांत पाटील, सर्वेश तरे आणि कृती समितीचे सर्व पदाधिकारी यांनी झेंडा दाखवून सुरु करण्यात आली. मोठ्या उत्साहाने, मोठ्या संख्येने सहभागी होऊन हजारोंच्या संख्येने कार, बाईक, रिक्षा होत्या. वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर जवळून पाम बीच मार्गे विमानतळ रेती बंदर गेट ते कालभैरव मंदिर अशी ही भव्य रॅली संपन्न झा चिंचपाडा करंजाडे पनवेल येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.



