
प्रतिनीधी-पिंपरी-चिंचवड मनपा सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सन २०२३-२८ या पंचवार्षिक कालावधीच्या
निवडणुकीसाठी पतसंस्थेचे विद्यमान संचालक आणि पॅनलप्रमुख अंबर चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली तयार
झालेला “आपला महासंघ पॅनल” उभा आहे. आणि याचे निवडणूक चिन्ह कपबशी आहे.
सध्या पतसंस्थेत अनागोंदी कारभार चालू आहे. सभासदांना तातडीच्या कर्जासाठी हेलपाटे, कर्जवाटप करताना पक्षपातीपणा, अपमानास्पद वागणूक, अरेरावीची भाषा आणि उद्धटपणा याला सामोरे जावे लागत आहे. सभासदांना चांगली वागणूक मिळत नाही. संचालकाने स्वतः मागणी करूनही पतसंस्थेचे प्रोसिडिंग दाखविले जात नाही. मर्जीतील एकच ऑडीटर वेगवेगळ्या फर्मच्या नावाने वर्षानुवर्ष ऑडीटचे काम करत आहे. त्यामुळे खरे ऑडीट होते की चोरीछुपे गैरकारभार सुरू आहे, हे समजायला मार्ग नाही. यासाठी आम्ही रिऑडीटची मागणी केली, तर ती
मान्य केली जात नाही.
पतसंस्थेमध्ये कर्मचारी भरती करताना नियमबाह्य पद्धतीने करण्यात आली असून स्वतःच्या नातेवाईकांनाच पात्रता नसताना व सहकार खात्याच्या अटी शर्तीमध्ये बसत नसताना नियुक्ती तर दिलीच त्याशिवाय पदोनती देऊन पतसंस्थेमध्ये व्यवस्थापक पदावर बसविले आहे. त्यामुळे गैरव्यवहार करण्याचा यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याने चुका करून पतसंस्थेचे नुकसान केले तरी त्याला पाठिशी घातले जात आहे. पतसंस्थेचे कार्यालय २ कोटी ६० लाखांना खरेदी करताना ९० टक्के पैसे दिले. उरलेले १० टक्के कम्प्लीशन
सर्टिफिकेट मिळाल्यानंतर देणे योग्य असताना, यांनी आधीच तेही देऊन टाकले.
सगळ्यात गंभीर बाब म्हणजे कर्जमंजुरीसाठी अडवणूक करून पैशांची मागणी होऊ लागली आहे. तज्ज्ञ
संचालकाला भेटा असा निरोप कर्जदाराला दिला जातो. हा तज्ञ संचालक नववी पास आहे. त्याने स्वतःची जाहिरात पतसंस्थेच्या पैशातून केली. आम्ही प्रकरण उघडकीस आणल्यावर घाईघाईने पैसे भरले. निर्वाचित संचालकां ऐवजी तज्ञ संचालकच सगळा कारभार पाहतो. पतसंस्थेचा उपाध्यक्ष निरक्षर असून स्वतःच पतसंस्था उघडायला येतो. यांच्या नाकर्तेपणामुळे सुमारे ३ हजार कर्मचारी पतसंस्थेचे सभासदच झालेले
नाहीत.
आज पतसंस्थेच्या विकासाची चाके एकाधिकारशाही, दादागिरी, झुंडशाही आणि भ्रष्ट कारभाराच्या दलदलीत रुतून बसली आहेत. चांगल्या कारभारासाठी सकारात्मक विचारांचे, लोकशाही मार्गाने सदैव पतसंस्थेच्या आणि सभासदांच्या प्रगतीचा विचार करणारे आणि उत्तम प्रशासकीय आणि आर्थिक सोयीसुविधा देण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांचे आमचे पॅनल निवडून देणे काळाची गरज आहे.



