शहरसामाजिक

अनुवाद आपला न्यूजच्या बातमीचा दणका मेसर्स माईंड स्पेस हॉटेल्स अँड रिसॉर्ट मालकाने उपोषण कर्त्यांच्या सर्व मागण्या केल्या मान्य…

पिंपरी प्रतिनिधी- माईंड स्पेस हॉटेल्स अँड रिसॉर्टचे मालक श्री प्रशांत भंडारी तसेच मध्यस्थी श्री. अमोल थोरात आणि श्री. प्रशांत भंडारी यांचे कामगार श्री. अनिल श्रीमंदिलकर हे पिंपरी पोलीस स्टेशन येथे माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे कार्यालयात बोलणी करण्यासाठी आले होते.
या ठिकाणी श्री प्रशांत भंडारी यांनी असे आश्वासन दिले की तुम्ही उपोषण मागे घ्या. मी तुमच्या मागणी नुसार खालील सर्व मागण्या मान्य करीत आहे.

कामगारांच्या मागण्या खालील प्रमाणे

१) एम. एस. एच. आर. तर्फे न भरलेला प्रॉव्हिडंट फंड देण्यात यावा.
२) कामगारांची ग्रॅज्युटी देण्यात यावी.
३) कामगारांच्या वार्षिक सुट्ट्यांचे पैसे देणे.
4) कामगारांचा साल २०१९-२०२० चा बोनस.
५) कामगार कायद्यानुसार कामगारांचा क्लिअरन्स.
६) कामगारांना काम केल्याच्या अनुभवाचा दाखला देणे.
७) श्री प्रशांत भंडारी यांच्याद्वारे काल वरिष्ठ पोलीस अधिकारी पिंपरी पोलीस स्टेशन यांचे समोर जाहीर केल्याप्रमाणे आस्थापन बंद आहे आणि त्याप्रमाणे कामगारांना कामातून मुक्त केल्याची तारीख ही साल 2023 ची असावी. जेणे करुन इतरत्र काम करतांना त्यांना अडचन होवू नये.
श्री प्रशांत भंडारी यांच्या शब्दावर आम्ही उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु दिलेल्या आश्वासनाची निराशा केल्यास आंदोलन अति तीव्र केले जाईल असे उपोषण कर्ते श्री. नितिन बाबुराव दुनघव यांनी आमच्या प्रतिनीधींला सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!