अनधिकृतआंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

आंबेडकरी जनतेला महत्वपूर्ण बैठक विनम्र आवाहन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३१ जानेवारी २०२५ आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व भीम अनुयायांना कळविण्यात येते की डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का येथील आंबेडकर भवनासाठी असणारी दोन एकर जागा बांधकाम व्यवसायिकाच्या घशात घालण्याचे काम शासन, प्रशासनाने केल्यामुळे अनेक वर्षांपासून पुणे शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एकही उचित असे स्मारक नसल्यामुळे आंबेडकर भवनाला लागून असलेली पीडब्ल्यूडीची जागा भवनासाठी मिळावी म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून कागदोपत्री संघर्ष चालू होता. परंतु त्यास अपयश आले आहे. २००० सालपासून पुणे महानगरपालिकेने तसा ठराव पास केला होता. त्यानंतर २०१६ मध्ये मुख्यमंत्री यांनी देखील ही जागा आंबेडकर भवनासाठी देण्यात यावी असा शेरा मारला होता. परंतु आता विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर शासनातील काही राज्यकर्त्यांनी ५०० कोटीची जागा अवघ्या ६० कोटी मध्ये खाजगी बांधकाम व्यवसायकाला दिली आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. आणि आंबेडकरी चळवळीने केलेल्या मागणीला काळिंबा फासणारी आहे.  म्हणून ही आमच्या अस्मितेची लढाई लढण्यासाठी व जन आंदोलनाची भूमिका घेण्यासाठी, आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष, संघटनातील पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने या बैठकीसाठी मोठ्या संख्येने  उपस्थित राहावे मतभेद मनभेद अनेक गटातटाचे पायताने बाजूला ठेवून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकासाठी एकत्रित येऊन लढा उभा करूया आणि त्याचाच विचार करण्यासाठी आंबेडकरी जनतेच्या एकीसाठी या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असून आपली उपस्थिती अत्यंत महत्वाची असून दिशा देणारी नक्कीच असेल यामध्ये शंकाच नाही मला खात्री आहे आपण मोठ्या संख्येने या बैठकीला हजर राहाल ही अपेक्षा. 
या मिटींगमध्ये एक समन्वयक समिती बनविण्यात येणार आहे, तमच्यापैकी कोणाला या समिती वर यायचे असल्यास त्यांनी आपली नावे द्यावी. या मिटींगच्या अध्यक्षपदी वसंत दादा साळवे असतील.
बैठकीचे स्थळ व वेळ-

शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२५,
वेळ सायंकाळी ५:३० वा. वाजता 
स्थळ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भीमसृष्टी) परिसर पिंपरी चौक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!