
प्रतिनीधी पिंपरी चिंचवड दि. ०१ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वसामान्य नागरिकांची अविरत सेवा करणारे शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष अमोल लोंढे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार-२०२५ (राज्यस्तरीय) या राज्य पुरस्काराने सन्मानित. बालगंधर्व नाट्यमंदिर पुणे येथे आयोजित कार्यक्रमात
या वर्षीचा हा दुसरा सामाजिक पुरस्कार मिळाला आहे.
हा पुरस्कार माझ्या मित्रांना व आई वडीलांना समर्पित करत आहे. मित्रांशिवाय माझे सामाजिक काम अपूर्ण आहे. असं मत अमोल लोंढे यांनी व्यक्त केले.
शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश कळवले पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे शिवशाही वाहतूक आघाडी अध्यक्ष अनिल तांबे पिंपरी चिंचवड शहर महासचिव सुरज अण्णा कांबळे यांनी महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार्थी अमोल लोंढे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.



