
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०३ फेब्रुवारी २०२५ कार्यसम्राट नगरसेवक राहुलभाऊ भोसले युवा मंच यांच्या माध्यमातून अजमेरा कॉलनी पिंपरी या ठिकाणी करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर हणुमंतराव (अण्णा) भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी क्रीडा सभापती समीर मासुळकर, या कार्यक्रमाचे आयोजन कमलेश वाळके यांनी केले होते.
पुणे शहर बॉक्सिंग संघटना यांच्या मान्यतेने आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या होत्या यामध्ये मार्गदर्शक श्री बळवंत सुर्वे सर. व सुकन्या सुर्वे यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले.
पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना आयोजित स्पर्धेत विजयी झालेला सर्व खेळाडूंचे
कार्यसम्राट नगरसेवक राहुल भाऊ भोसले युवा मंच यांच्या वतीने जाहीर सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व खेळाडूंना माजी महापौर हनुमंतराव भोसले यांनी मार्गदर्शन केले. व सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच समीर मासुळकर यांनी देखील सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने खेळाडू व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक कमलेश वाळके यांनी सर्व खेळाडूंच्या पाठीशी सदैव आम्ही आहोत. असे आश्वासन देऊन सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.