
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०४ फेब्रुवारी २०२५ विठ्ठल नगर नेहरूनगर, पुनर्वसन प्रकल्प तसेच नेहरूनगर ( कोर्ट ) न्यायालया समोर मोठ्या प्रमाणामध्ये भटकी कुत्रे दहा ते पंधरा कुत्र्यांचा कळप असल्याने अनेक लहान मुलांना या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. तसेच नागरिकांना देखील या कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे अनेक जण या कुत्र्यांपासून जखमी झाले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात मोटरसायकल वरील नागरिकांच्या मागे देखील ही कुत्रे भुंकत मागे लागून चावत असतात. यामुळे अनेक टुविलर चालवणारे नागरिक देखील पडून जखमी झाले आहेत.
सध्या या कुत्र्यांमुळे विठ्ठलनगर नेहरूनगर पुनर्वसन प्रकल्पामध्ये तसेच नेहरूनगच्या संपूर्ण परिसरात दहशतिचे वातावरण तयार झाले
आहे. अनेकदा सारथी हेल्पलाइन वरती तक्रार करून देखील या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नाही.
तरी आपण येत्या आठ दिवसांमध्ये या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. अन्यथा आपल्या कार्यालयामध्ये या कुत्र्यांची लहान पिल्ले आणून सोडले जातील. याची नोंद घ्यावी.
असे भिमशाही यूवा संघटनेचेसंस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे व पदाधिकारी कमलेश वाळके, नितीन कसबे यांनी पत्राद्वारे आयुक्तांना निवेदन दिले आहे.