देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले डॉ. दीपक हरके यांना सन्मानित..

प्रतिनिधी पिंपरी, पुणे दि. ३ फेब्रुवारी २०२५ पुणे आणि अहमदनगर मधील प्रजापिता ब्रह्मकुमारी ध्यानधारणा केंद्राचे प्रशिक्षक डॉ. दीपक हरके यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी झालेल्या संचलन सोहळ्यात विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रित केले होते. ध्यानधारणा क्षेत्रात जगभरात केलेल्या योगदानाबद्दल डॉ. दीपक हरके यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील विशेष पाहुण्यांसमवेत या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा बहुमान मिळाला. तसेच राष्ट्रपती भवन मधील अमृत उद्यान मध्ये प्रजासत्ताक दिनी झालेल्या ऐट होम रिसेप्शन मध्ये ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत
सहभागी होण्याची संधी मिळाली. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉ. दीपक हरके यांच्यासह त्यांचे सहकारी सूर्या भाई, गीता दीदी, सतेंदर भाई, विकास भाई व बसंत भाई यांना भेटीसाठी राष्ट्रपती भवनातील त्यांच्या कार्यालयात वेळ दिला व संवाद साधला. यावेळी राष्ट्रपतींनी डॉ. दीपक हरके यांना शाल परिधान करून सन्मानित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!