
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.०७ फेब्रुवारी २०२५ तिन दिवसांन पूर्वी दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ मंगळवार रोजी “कुलस्वामिनी महिला व बालकल्याण महासंघाची” स्थापना स्मार्ट सिटी संचालक व मनसे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मा. सचिन भाऊ चिखले, मा. नगरसेविका सौ. कमलताई घोलप, मा. सौ. शुभांगीताई बोऱ्हाडे, राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल शहराध्यक्ष ॲड. संतोष शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली. यावेळी ” माननीय सचिन चिखले यांनी महिला भगिनीस मार्गदर्शन करताना सांगितले की – महासंघाच्या माध्यमातून समाजातील अनेक महिलांनी एकत्र येऊन आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सबलीकरणासाठी प्रयत्न करावेत, मनपा, राज्य सरकारच्या विविध योजनांद्वारे महिलांच्या सबलीकरणासाठी, स्वयंरोजगार निर्मिती करिता संस्थेच्या माध्यमातून प्रयत्नशील राहावे, तसेच सौ. कमलताई घोलप त्यांनी देखील महिलांना मार्गदर्शन करताना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक सबलीकरण प्राप्त करावे समाजाची व कुटुंबाची प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. सौ शुभांगी ताई बोऱ्हाडे यांनी सांगितले की बचत गटांच्या माध्यमातून व महासंघाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांद्वारे बेरोजगार महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता अध्यक्षा सौ. शितल शिंदे व महासंघाला शुभेच्छा दिल्या”
यावेळी महासंघाचे अध्यक्षा सौ. शितल संतोष शिंदे यांनी प्रास्ताविक करून महासंघाच्या स्थापनेचे ध्येय उद्दिष्ट व महिलांप्रती काम करण्याचे वचन सर्व महिला भगिनीस दिले, तसेच सौ. कीर्ती भारती यांनी आभार मानले, याप्रसंगी – सौ. श्रद्धा ढवळे, सौ. दिक्षा ढवळे, सौ. रेश्मा शिंदे, सौ. कविता शिंदे, सौ. राजश्री कलाल, सौ.अर्चना कुंभार, श्रुती ढवळे, सौ. संगीता प्रजापती, सौ.सुशीला पवार, सौ.भारती तांबवे, सौ.उषा शिंदे, सौ.संगीता तांबवे, सौ. माधुरी कसबे, सौ. लक्ष्मी घोडे, सौ. आशा देशमुख, सौ. धाईंजे आणि इतर महिला भगिनी उपस्थित होत्या.



