गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

घरफोडी चोरी करणारे अटटल चोरांना हिंजवडी पोलीसांनी केली अटक, घरफोडी चोरीचे ९ गुन्हे उघड..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३० मे २०२४ मागिल सप्ताहात दि. २३/०५/२०२४ रोजी फिर्यादी नामे- अभिजीत गोकुळदास मारवाडी वय ३८ वर्षे धंदा-नोकरी रा.घर नं. – अ/७०१, आमोरा होम्स कस्पटे वस्ती ता. मुळशी जि. पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ६६९/२०२४, भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना दिनांक २४/०५/२०२४ रोजी राम गोमारे, सहायक पोलीस निरीक्षक यांना गोपनीय बातमीदार यांचेमार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे
१) दयामान्ना शिवपुरे २) दुर्गाप्पा श्रीराम
यांनी केलेला असुन ते हिंजवडी भागात येणार असल्याची खबर मिळाल्यावरुन वरील आरोपींबाबत हिंजवडी पोलीस ठाणेचे सपोनि राम गोमारे, व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी त्यांना सापळा लावुन ताब्यात घेवून आरोपी नामे- १) दयामान्ना यल्लाप्पा शिवपुरे वय – ४२ रा. शिवाजीनगर दत्तमंदीराचे मागे, देहुरोड पुणे २) दुर्गाप्पा श्रीक्रिष्णा श्रीराम वय – ४५ रा. शिरालींग नगर जुना बिडी घरकुल सोलापुर यांस पकडुन त्यांना दि. २४/०५/२०२४ रोजी ००/३५ वा. अटक केली. त्यांचे रेकॉर्ड तपासले असता आरोपी क्रमांक १ याचेवर यापुर्वी देहुरोड पो.स्टे., चतुश्रृंगी पो.स्टे., हिंजवडी पो.स्टे. निगडी पोलीस ठाणे, पिंपरी पोलीस ठाणे चोरी व घरफोडी चोरीचे १२ गुन्हे दाखल असल्याचे समजले त्या अनुषंगाने आरोपींकडे तपास केला असता त्यांनी हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ६६९/२०२४, भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे काही दागिने काढुन दिले.
आरोपी यांचे रेकॉर्ड तपासुन त्यांची पोलीस कोठडी घेवून पुन्हा त्यांचेकडे सखोल तपास केला असता आरोपीत मजकुर यांनी दोघांनी मिळुन खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे कबुल करुन यातील सोने व चांदीचे दागिने व इतर साहित्य काढुन दिले आहेत.
आरोपींनी वरील गुन्हे ..
१) हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ६६९/२०२४, भादवि कलम ४५४, ४५७, ३८०, ३४
२) हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ६३१ / २०२४, भादवि कलम ३८०
३) हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ५८२ / २०२४, भादवि कलम ४५४, ४५७,३८०
४) हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं १९८ / २०२४, भादवि कलम ४५४, ४५७, ३८०, ४२७
५) हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ३१ / २०२४,
६) हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ६६०/ २०२४, भादवि कलम ४५४, ४५७,३८० भादवि कलम ४५४, ४५७, ३८०
७) हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ५५९/२०२४, भादवि कलम ४५७, ३८०
८) हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ११२८/२०२३
९) हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ७९३/२०२३ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० भादवि कलम ४५४, ३८०, ४२७
आरोपींनी वरील प्रमाणे गुन्हे केल्याचे कबुल केल्याने त्यांचे कडुन एकुण – १० तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे तसेच चांदीचे दागिने असे एकुण ४,८०,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला असुन वरील प्रमाणे ०९ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
[29/05, 10:11 pm] Press reporter Laxman Rokade: .
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. बापु बांगर, पोलीस उप आयुक्त परि २, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिं चिं यांचे मार्गदर्शना खाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. ऋषीकेश घाडगे, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!