
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १८ जानेवारी २०२५ पॅंथर युवा मोर्चाच्या वतीने भोसरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारका समोर परभणी येथील पॅंथर सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत हत्या करण्यात आली तसेच बीड मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची काही समाजकंटकांनी हत्या केली या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ तसेच नव नियूक्त मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकता मानुन थोडीशी तरी लाज असेल तर ताबडतोब राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी रामभाऊ ठोके व उपस्थितांचे वतिने धरणे आंदोलन दरम्यान करण्यात आले. यावेळी पॅंथर युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ ठोके तसेच कामगार आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पांडुरंग राठोड, सुरेश आबा डोळस, जिल्हाध्यक्ष शीलाताई मोरे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा शारदाताई कसबे मायावती कोळेकर आशाताई मोरे , संविधानरक्षक हरिभाऊ डोळस, जय भारत कुंभारे, प्राध्यापक युवराज भास्कर तिकटे, माऊली बोराटे, रंगनाथ ठोंबरे, भैय्यासाहेब शिंदे, कमलाकर नरसिंगे, पिंटू प्रसाद, रोहित प्रसाद, पंजाबराव कटके, पॅंथर युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते



