
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०९ फेब्रुवारी २०२५ उद्योजकांचे खड्ड्यात बसून निषेध महावितरण विरोधात महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे एमआयडीसीमध्ये दोन दिवस टी ब्लॉक मधील कंपन्या सातत्याने बंद असल्याने महावितरणने नुकसान भरपाई द्यावी असे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांची मागणी. भोसरी एमआयडीसी परिसरात टी ब्लॉक येथे दोन दिवस सातत्याने विजेचा लपंडाव चालू आहे आणि कामाला दिरंगाई होत आहे. यासाठी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी महावितरण करत असलेल्या कामाच्या खड्ड्यात बसून तीव्र आंदोलन केले आणि जोपर्यंत संबंधित अधिकारी या ठिकाणी येऊन माहिती देत नाही तोपर्यंत खड्ड्यातून उठणार नसल्याचे जाहीर केले. थोड्याच वेळात या ठिकाणी महावितरणचे मुख्य अभियंता देवकर साहेब आल्यानंतर त्यांनी तत्पर्तेने कामास प्राधान्य देऊन परिसरातील लाईट चालू केल्यानंतर उद्योजकांनी माघार घेतली आणि येत्या दोन दिवसात संबंधित विभागाशी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले परिसरामधील सर्व केबल या जुन्या झाल्या असून प्रत्येक वेळी दुरुस्त केल्यानंतर अवघ्या तासाभरातच पुन्हा व्यथा निर्माण होत आहे महावितरणला फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे वारंवार फिडर कंडक्टर आणि जुन्या केबल या बदलण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे. परंतु महावितरणच्या कार्यालयामधून अद्याप त्यावर कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नाही त्याचा भुर्दंड येथील कंपन्यांना होत असून गेल्या दोन दिवसात कोट्यावधीचे नुकसान झालेले आहे. ऐक तर विजेचे भरमसाठ दर त्यामध्ये उद्योजकांना वीज बिल सवलती मध्ये भरण्यास मुभा देण्यात येत नाही रात्रीच्या वेळी येऊन संबंधित अधिकारी वर्ग कंपन्यांच्या वीज तोड करत आहेत. याला उद्योजक कंटाळलेले आहेत. सातत्याने विजेचा लपंडाव म्हणून उद्योजक कंटाळलेले आहेत आणि पिंपरी चिंचवड एमआयडीसीच्या या गलथान कारभाराला कंटाळून एमआयडीसीतील उद्योग स्थलांतरित होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. लवकरच महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून उद्योजकांना सुविधा या मिळाल्या पाहिजेत अशी मागणी अध्यक्ष अभय भोर यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा केली आहे. यावेळी उद्योजक कृष्णा वाळके, मोहिते साहेब, आनंद जाधव, वैभव जगताप, प्रशांत पठारे, अरविंद देशमुख आणि परिसरातील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.



