डोंबिवलीकर अजित राय नॅशनल लेवल 2 सिल्वर,1 ब्राॅज पटकावले

प्रतीनिधी सतिश वि.पाटील मुलुंड मूंबई दि. १३ फेब्रुवारी २०२५ आज स्वप्न साकार झाले रनिंगची प्रॅक्टिस करायचा.. खूप खूप मेहनती मुलगा. बोलतात ना तोंडाला फेस येईपर्यंत प्रॅक्टीस करणे. अशातला अजित ..चिकाटी , काबाड कष्ट, जीव तोड मेहनत काय असते ती त्यांच्याकडून शिकावी. असा हा अजित राय एकदम सामान्य कुटुंबातला. वडील रिक्षा चालतात व हाराचे छोटे दुकान चालवतात.. त्याला आर्मी मधेच जायचे होते म्हणून तो एवढी मेहनत करत होता आणि त्याचे फळ त्याला मिळाले..
पुढे त्यात म्हणजे आर्मीतही स्पोर्ट्स मध्येच नाव कमवायचे होते म्हणून पुन्हा त्याच चिकाटीने, जिद्दीने मेहनत केली म्हणजे रोज ४०,५० km सायकलिंग, २० km रनिंग, आणि मग रिव्हर राफ्टिंग… अशी जिवापाड मेहनत करून नॅशनलला २ सिल्वर व ऐक ब्राँझ पदक मिळविले.. आंध्र प्रदेश कडून खेळला …
अजित तुझे खूप खुप कौतुक..
तुझे खूप खूप अभिनंदन
आज तू आपल्या डोंबिवलीचे, नाव रोशन केलेस.. समस्त डोंबिवली करानकडून तुझे अभिनंदन.. जर इच्छा शक्ती आणि जिद्द, सातत्य असेल तर खरच खूप काही जीवनात यश संपादन करू शकतो..