इटलीत भारतीय झेंडा फडकवला जागतीक आईस स्विमिंग ताम्रपट विजेता प्रभात कोळी..

प्रतिनिधी सतिश वि. पाटील मुलूंड मुंबई दि. १३ फेब्रुवारी २०२५ इटलीत भारतीय झेंडा फडकवला याचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान वाटावा.
उलवे नवीमुंबई येथील जलतरण पट्टू प्रभात कोळी इटली मधील मोल्व्हेना येथे पार पडलेल्या सहाव्या जागतिक बर्फ जलतरण स्पर्धेत २५/२९ वर्ष वयोगटात तीसरा येऊन ताम्रपट विजेता ठरला १.१० अंश सेल्सिअस इतके तापमान असलेल्या या आईस स्विमिंग चाॅपियनशिप स्पर्धेत त्याने २५० मिटर फ्रिस्टाईल स्पर्धेत हा पराक्रम केला आहे आजपर्यंत कोणत्याही भारतीयाने बर्फ जलतरण स्पर्धेत पदक मिळवले नाही हे पहिलेच पदक पटकावून इतिहास रचला या साठी प्रभात याने डिसेंबर २०२४ मध्ये नैनिताल येथील ८-९ अंश सेल्सिअस तापमानात थंड पाण्यात सराव केला होता तसेच तो स्पर्धेसाठी इटलीला पोहोचला तेंव्हाही त्याने तेथील ५-६ अंश सेल्सिअस तापमानाच्या मोल्व्होनो लेकमध्ये सराव करून अथक मेहनत केली या कठीण प्रवासात साथ देणाऱ्यांचे प्रभातने आभार मानले असून ही भारतीय आईस स्विमिंगसाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याची प्रभात कोळीने प्रतिक्रिया व्यक्त केली.