लॉटरी बंदीची कोंडी फुटली विक्रेत्यांच्या आंदोलनाचा दणका..

प्रतिनिधी सतिश वि.पाटील मुलूंड मुंबई दि. १३ फेब्रुवारी २०२५ ग्राहक, विक्रेते, सरकार यांना आर्थिक आधार असणारी महाराष्ट्र राज्य लॉटरी बंदीचा निर्णय सरकार घेणार होते पण विक्रेत्यांच्या जबरदस्त आंदोलनाचा दणका बसला असून अस्थिरतेची कोंडी फुटली आहे.
महाराष्ट्र राज्य लॉटरी तोट्यात आहे म्हणून मार्च २०२५ नंतर छपाईचे काम थांबविण्यात आले होते. त्यामुळे लाखों विक्रेते व त्यांचे कुटुंबिय यांच्यावर बेरोजगारीची टांगती तलवार होती. अखेर विक्रेत्या संघटनेने केलेल्या पध्दतशीर आंदोलनामुळे सरकारला लॉटरी बंदीचा निर्णय रद्द करावा लागला.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिवसेना नेते उध्दवजी ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते, अंबादास दानवे यांची भेट घेऊन संघटनेने लॉटरी वाचविण्यासाठी मागणी केली. प्रशासनाने सोयीचा अर्थ लावून आकडे फुगविले आहेत. हे आकडेवारीच्या आधारे मांडले होते. दादर येथे लॉटरी विक्रेत्यांचा लॉटरी बचाव मेळावा तसेच पत्रकार परिषदा यातूनही सरकारचे लक्ष हे वेधण्यात आले होते.
लॉटरीची छपाई ही परराज्यात होते त्यामुळे तिकिटे विलंबाने मिळतात. ही छपाई राज्यातच करावी अशी ही मागणी विक्रेत्यांचे नेते सातार्डेकर यानी केली होती. त्याला ही मान्यता मिळाल्याचे समजते. लॉटरीला अभय दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह राज्य शासनाचे आभार संघटनेतर्फे मानण्यात आले आहे.
हा विजय लॉटरी विक्रेत्यांचा आहे ! एकजुटीचा आहे! अशी प्रतिक्रिया संघटनेचे युवा अध्यक्ष सुमित सातार्डेकर सरचिटणीस राजेश बोरकर, उपाध्यक्ष कमलेश विश्वकर्मा, मुंबई अध्यक्ष विनोद गाडेकर, ठाणे जिल्हाध्यक्ष महेश कोळी यानी व्यक्त केली आहे. लॉटरी ट्रेड एजेंट एसोसिएशन /रोजगार बचाओ समितीनी ही या मागणीसाठी पाठपुरावा केला होता.