मुलुंड पोलिस ठाणेचा अभिनव उपक्रम “जनता दरबार”

प्रतिनीधी सतिश वि.पाटील
मुलुंड दि. १६ फेब्रुवारी २०२५ मुलुंड पोलिस ठाणे परिमंडळ ०७ च्या माध्यमातून जनता व पोलिस यांची संयुक्त बैठक व मार्गदर्शन मुलुंड मध्ये वेळोवेळी करण्यात आले
०१) रोटरीक्लब
०२) मुलुंड काॅलनी
०३) नाहूर अशोक नगर पोलिस चौकी बीट-३
०४)विकास सेंटर
असे जन जागृती अभियान राबविण्यात आले मार्गदर्शन करण्यात आले नवीन तीन कायदे जनसामान्यांपर्यंत प्रसार व माहीती प्रोजेक्टर च्या माध्यमातून देण्यात आली मुलुंड पोलिस परिमंडळ ०७ डीसीपी मा. विजयकांत सागर, मुलुंड विभाग एसीपी संदीप मोरे, मुलुंड पोलिस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ निरीक्षक अजय जोशी, पोलीस निरीक्षक कोकाटे व पोलिस उपनिरीक्षक, बोरसे यांनी सायबर क्राईम जन जागृती केली. तसेच जनसंपर्क साधून भ्रृण हत्या व “बेटी बचाव बेटी पढाव” या अनुषंगाने रॅली काढण्यात आली पोलिस व सामान्य नागरिक यांची सांगड घालून दिली अनेक प्रश्न व उत्तरे योग्य रितीने सोडवण्यात आले. महीला सुरक्षा, अन्याय, नशामुक्ती यावर मार्गदर्शन झाले. पोलिस हा देखिल एक माणूसच आहे फक्त कायदेशीर हक्क व संरक्षण यांनी याचे पालन करण्यात समर्थ असतात. जनजागृतीपर कार्यक्रमात अनुवाद आपला न्युजचे पत्रकार सतिश वि.पाटील तसेच भावना राजवाडा, प्रभाकर कांबळी, आर. पी. आय. व मुलुंड मधील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.



