आंदोलनआरोग्यनाशिकमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

अखेर नाशिकच्या आरोग्य मित्रांनी उपसले संपाचे हत्यार..

प्रतिनिधी रेणूका गायकवाड महाले नाशिक दि. १९ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने १२ फेब्रुवारी २०२५ पासून त्यांच्या मागण्यासाठी बेमुदत संपावर जाण्याबाबत कायद्यानुसार नोटीस दिलेली आहे. या नोटिशीची दखल घेवुन आपण दिनांक – ०७/०२/२०२५ रोजी संबंधित टी. पी. ए. व संघटनेचे प्रतिनीधींची संयुक्त बैठक आपल्या कार्यालयात बोलावली व आरोग्य मित्रांच्या मागण्या बाबत चर्चा केली. या चर्चेच्या वेळी वेतनवाढ व वार्षिक इन्क्रिमेंट इत्यादी बाबत निर्णय करण्यासाठी दहा दिवसाचा अवधी द्यावा अशी विनंती टीपीएच्या प्रतनीधींनी केली तसेच धुळे जिल्हयातील आरोग्य मित्रांचा पेट्रोल अलाऊंस एक महिन्यात देण्यात येईल असे सांगीतले होते. आरोग्यमित्रांच्या जिल्हयाच्या बाहेर व गैरसोयीच्या बदल्या केल्या जाणार नाहीत, आरोग्य मित्रांना त्यांच्या मागणीनुसार एक्सपिरीयन्स सर्टिफिकेट दिले जाईल, झालेल्या सेवेबाबत ग्रॅच्युइटी संदर्भात १० दिवसात कायदेशीर उत्तर दिले जाईल असे सांगण्यात आले होते. आरोग्य मित्रांच्या रजेबाबतचे धोरण टीपीए मार्फत १० दिवसात लेखी देण्यात येईल, इत्यादी मागण्याबाबत सकारात्मक निर्णय केले, आरोग्यमित्रांचे वेतन पुरेसे नाही याबाबत सर्वांचेच एक मत दिसुन आले.
आपण टी. पी. ए यांना वेतन वाढ आणि आर्थिक मागण्याबाबत निर्णय करण्यासाठी दहा दिवसाचा वेळ द्यावा असे संघटनेला सुचविले होते. या बैठकितील चर्चेबाबत आरोग्य मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक होऊन टी.पी.ए. यांनी विनंती केल्याप्रमाणे व आपण सुचवल्याप्रमाणे दहा दिवसाचा अवधी वेतन वाढ व अन्य मागण्यांबाबत निर्णय करण्यासाठी देण्यात यावा यास सर्व आरोग्यमित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संमती दिली आहे.
त्यानुसार १७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत संपाच्या नोटीसीतील मागण्याबाबत ठोस निर्णय करावेत अशी आपणास विनंती करण्यात आली होती.
१७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत योग्य निर्णय न केल्यास पुर्वी दिलेल्या संपाच्या नोटीसीनुसार १८ फेब्रुवारी २०२५ पासून राज्यातील सर्व आरोग्यमित्र संपावर जातील याची आपण नोंद घ्यावी असे सूचित करण्यात आले होते.
अशी वेळ आपण येऊ देणार नाही अशी अपेक्षा देखिल व्यक्त करण्यात आली होती. परंतू या बाबत आज पर्यंत निर्णय न झाल्याने पूर्व नियोजित संपाचे हत्यार उपसावे लागले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!