तत्वांशी एकनिष्ठ रहात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या उपशहराध्यक्ष पदाचा दिला राजीनामा.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०२ मार्च २०२४ सागर ओरसे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या (अजितदादा पवार गट) युवक उपशहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर पदाचा राजीनामा दिला. पक्षाची स्थापना शरद पवार साहेबांनी केल्यापासून पक्ष अजितदादा पवार यांच्याकडे जाण्यापर्यंत पिढ्यान पिढ्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम केले. आज अत्यंत जड अंतकरणाने पक्षातील पदाचा राजीनामा दिला. पक्षाचा राजीनामा देत असताना कसला ही वैयक्तिक स्वार्थ नाही. परंतु सामाजिक जीवन जगत असताना सामाजिक काम करत असताना, काही चुकीच्या धोरणांकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
राजीनामा देण्याची काही कारणे खालील प्रमाणे,
०१) काँग्रेसच्या काळातील शासनाने RTE अंतर्गत गोरगरीब व मागासवर्गीय मुला-मुलींसाठी खाजगी शाळांमध्ये 25% आरक्षण ठेवले होते. आपल्या स्वतःच्या घरापासून साडेतीन किलोमीटर अंतर्गत येणाऱ्या खाजगी शाळांमध्ये
मागासवर्गीय मुला-मुलींसाठी जातीच्या दाखल्यावर व इतर समाजातील मुला मुलींसाठी उत्पन्नाच्या दाखल्यावर प्रवेश मिळत होता. त्या मुला मुलांची असणारे फी शासन भरत होते. परंतु आत्ताच्या शासनाने RTE कायदा अंतर्गत
नवीन बदल केले आहेत. ते बदल असे आहेत, खाजगी शाळांच्या 1 किलोमीटर पर्यंत जर शासकीय शाळा असेल तर, त्या खाजगी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्रवेश मिळणार नाही. तुम्हीच सांगा अशी कोणती खाजगी शाळा आहे की त्याच्याजवळ एक किलोमीटरच्या अंतर्गत
महानगरपालिकेच्या शाळा नाहीत. म्हणजे गोरगरिबाच्या मुलांनी शिकूच नये असे या शासनाचे धोरण आहे.
०२) आज महाराष्ट्रात बहुसंख्य मराठा समाज आहे. आज शासनाने आपण पाहिले मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत शासनाने कशी फसवणूक केली. बहुसंख्या असणाऱ्या मराठा समाजाची शासन जर अशी फसवणूक करत असेल, तर लहान लहान समाजाचे पुढे काय हाल होतील याची कल्पना करायलाच नको.
देशात काय चालले आहे, राज्यात काय चालले आहे. हे तर आपण उघड्या डोळ्यांनी बघतच आहोत. असे आणखीन ही खूप काही कारणे आहेत माझ्या पदाचा राजीनामा देताना असे सागर ओरसे बोलले आहेत.




