Uncategorizedआंदोलनपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

अन्यथा पिंपरी चिंचवडमध्ये मंत्र्यांना प्रवेश रोखणार: सतीश काळे

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची शासनाने तातडीने दखल घ्यावी.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०७ सप्टेंबर २०२६ मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा काल दहावा दिवस होता. मात्र राज्य शासनाकडून या उपोषणाची अद्याप पर्यंत गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

राज्य शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी ठोस पावले उचलावीत सरकारने याकडे दुर्लक्ष करून परिस्थिती अधिक चिघळू देऊ नये अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतीश काळे यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दहावा दिवस उलटूनही सरकारकडून अपेक्षित गांभीर्य दाखवले जात नाही मराठा समाजाच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत राहिल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील शासनाने तातडीने चर्चा करून मागण्या मान्य करण्याच्या दिशेने निर्णय घ्यावा अशी भूमिका सतीश काळे यांनी व्यक्त केली.

सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर पिंपरी चिंचवड शहरात येणाऱ्या कोणत्याही मंत्र्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून रोखण्यात येईल असा इशारा सतीश काळे यांनी दिला आहे.

मराठा समाजाच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. शासनाने आंदोलनाची आणि समाजाच्या भावनांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तोडगा काढावा, अशी मागणीही काळे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button