आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

अन्यायाविरोधात भिमशक्ती संघटना मैदानात, कोथरूड पोलिसांवर कारवाईची जोरदार मागणी..

जातीय अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करा, अन्यथा तीव्र आंदोलन भिमशक्ती संघटनेचा इशारा !

प्रतिनिधी पूणे कोथरूड दि. ०५ ऑगष्ट २०२५ काल कोथरूड पोलीस स्टेशन, पुणे येथे भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी व कोथरूड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तीन दलित मुलींना जातिवाचक शिवीगाळ, अश्लील प्रश्न विचारून मारहाण केली.
या गंभीर प्रकाराविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी अ‍ॅक्ट) अंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी यावेळी भिमशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली.
अन्यथा भिमशक्ती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल! असा इशारा ही देणायात आला आहे.
यावेळी निवेदन देताना भिमशक्ती संघटना पुणे शहरचे अध्यक्ष विजय हिंगे, भिमशक्ती संघटना पुणे जिल्हा सरचिटणीस आदिनाथ कांबळे, भिमशक्ती संघटना युवक अध्यक्ष, पुणे शहर अजय जानराव, भिमशक्ती संघटना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष सुरज गायकवाड, भिमशक्ती संघटना महिला अध्यक्ष, पुणे सौ. सरलाताई थोरात, भिमशक्ती संघटना कार्याध्यक्ष उषाताई गायकवाड, भिमशक्ती संघटना महिला उपाध्यक्ष, पुणे शहर सौ. सुंदरताई ओव्हाळ, विजय ओव्हाळ – वरिष्ठ उपाध्यक्ष, आशिष वाघमारे अध्यक्ष, पर्वती विभाग, लक्ष्मण साळुंखे – कार्यकरनी सदस्य, पिंपरी चिंचवड, सलीमभाई शेख पुणे शहर संघटक, नाना जगताप, राहुल दादा उबाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!