अनधिकृतपिंपरी चिंचवड मनपा.महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ०२ अतिरिक्त आयुक्तांसह ३४ अधिकार्‍यांना नोटीस..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १८ मार्च २०२५ गेल्या दहा दिवसांमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये तपास पथकाला तब्ब्ल ३४ अधिकारी जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत आयुक्तांनी सामान्य प्रसासन विभागाकडून अहवाल मागितला असून भेटीच्या वेळी वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या ३४ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश दिले आहेत.
आयुक्त सिंह यांनी नागरिकांना भेटण्यासाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस दुपारी तीन ते सहा वेळ निश्चित केली. त्यानुसार, कार्यालयात नागरिकांसाठी उपलब्ध राहण्याचे निर्देश दिले. दहा दिवसांचा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीचा अहवाल तयार करून तो आयुक्तांकडे सादर केला आहे. यामध्ये ३४ अधिकारी एकपेक्षा अधिक वेळा गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.
ही आहेत अधिकाऱ्यांची नावे..
तपासणीत सर्वाधिक चार दिवस लेखा अधिकारी प्रवीण जैन, सहायक आयुक्त अमित पंडीत मिळून आले. तसेच, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, सहायक आयुक्त तानाजी नरळे, उमेश ढाकणे, महेश वाघमोडे हे तीन दिवस नसल्याची नोंद आहे. तर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, उपायुक्त मनोज लोणकर, सचिन पवार, पंकज पाटील, अण्णा बोदडे, सीताराम बहुरे, राजेश आगळे, प्रदीप टेंगल याबरोबर तेरा ते पंधरा अधिकारी एक ते दोन दिवस जागेवर नव्हते.
संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्याबाबत वेळ निश्चित केली आहे. मात्र, भेटीसाठी उपलब्ध नसलेल्या अधिकाऱ्यांबाबत तपासणी मोहीम राबवण्याचे आयुक्तांनी आदेश दिले होते. त्यानुसार, अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!